राष्ट्रवादीच्या घोषणेत भाजपची उडी!

sunil-patil2.jpg
sunil-patil2.jpg

नवी मुंबई : आगामी विधानसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेवून जनतेवर सवलतींची खैरात करण्याच्या शर्यतीत आता राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत भाजपही उतरली आहे. नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांच्या घरांना मालमत्ता करात पन्नास टक्के सवलत द्यावी अशी मागणी भाजपचे नगरसेवक सुनिल पाटील यांनी महापालिकेकडे केली आहे.

तसेच पाचशे चौरस फुटांच्या घरांचे प्रमाण पाहता त्या निर्णयाचा नवी मुंबईकरांना फारसा फायदा होणार नाही अशी टीप्पणीही पाटील यांनी केली आहे. राष्ट्रवादी आणि भाजपच्या या दोन राजकीय पक्षांमध्ये सध्या घोषणाबाजीवरून चांगलीच जूंपल्याने येणारी निवडणूक रंगतदार होणार आहे अस दिसतय.

पूढील पमचवीस वर्षे मालमत्ता करात वाढ न करणे, पाणी पट्टीत वाढ न करणे अशा घोषणाबाजी करून नवी मुंबईच्या मतदारांवर याआधीच राष्ट्रवादी कॉंग्रेसने गेली पंचवील वर्षे गारूढ घातले आहे. सलग दोन लोकसभांच्या निवडणूकीत ठाणे जिल्ह्यात पराभवाची धुळ चाखल्यानंतर नवी मुंबईतील एकहाती सत्ता निसटून जाऊ नये म्हणून राष्ट्रवादीच्या शिल्पकार नेत्यांकडून पुन्हा नवी मुंबईतील जनतेवर घोषणांची खैरात करण्यास सुरूवात झाली आहे.

त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेस येत्या सर्वसाधारण सभेत शहरातील पाचशे ते सातशे चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करात साठ टक्के सवलत देण्याचा प्रस्ताव मांडणार आहे. या प्रस्तावामुळे शहरातील तब्बल एक लाख चौऱ्याऐंशी हजार मालमत्ताधारकांना थेट लाभ होणार असल्याचा दावा राष्ट्रवादीने केला आहे.

परंतू भाजपने या निर्णयापेक्षा नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांच्या घरांना मालमत्ताकरात पन्नास टक्के सवलत देण्याची मागणी महापालिकेकडे करून पुन्हा प्रकल्पग्रस्त कार्ड वापरला आहे. भूमिपुत्रांच्या बलिदानावर उभी राहीलेल्या नवी मुंबई शहराच्या निर्मितीमधून अजूनही अनेक प्रकल्पग्रस्तांचे प्रश्‍न सुटलेले नाहीत. त्यामुळे भाजपने थेट प्रकल्पग्रस्तांना सवलत देण्याची मागणी करून एका भावनिक मुद्‌द्‌याला हात घातला आहे.

प्रशासनाने राष्ट्रवादीने केलेली मागणी मान्य केल्यास पाचशे ते सातशे चौरस फुटांपर्यंतची घरे असलेल्या प्रकल्पग्रस्तांना याचा लाभ होणार आहे. मात्र प्रकल्पग्रस्तांच्या घरांचा आकार पाहता हा निर्णय त्यांना तुटपुंजा दिलासा देणारा ठरणारा आहे. मात्र त्याउलट त्यांच्या घरांना पन्नास टक्के मालमत्ता करात सुट दिल्यास, हा प्रकल्पग्रस्तांच्या घरांचा आकारमान पाहता मोठा दिलासा देणारा ठरण्याची शक्‍यता आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com