भाजपला व्यापाऱ्यांची साथ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 फेब्रुवारी 2017

ठाणे - भाजपचा पाठीराखा समजल्या जाणाऱ्या व्यापारी वर्गाला निवडणुकीत प्रतिनिधित्व न दिल्यास उमेदवार उभे करण्याचा इशारा ठाण्यातील व्यापाऱ्यांच्या एका गटाने दिला होता; पण पॅनेल क्रमांक २२ येथून अर्ज दाखल करणाऱ्या महेंद्र जैन या व्यापारी संघटनेच्या उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज मागे घेत भाजपचे उमेदवार विकास दाभाडे यांना पाठिंबा दिला आहे.

ठाण्यातील व्यापाऱ्यांना उमेदवारीत न दिल्याने महेंद्र जैन यांनी शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या प्रभाग क्रमांक २२ येथून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता; मात्र मंगळवारी (ता. ७) आपला अर्ज मागे घेऊन भाजपच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला आहे. या प्रभागातून भाजपचे बंडखोर नीलेश कोळी आणि नम्रता कोळी यांनीही आपले अर्ज मागे घेतल्याने भाजपच्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. प्रभाग क्रमांक २२ येथून भाजपने विकास दाभाडे, रूपाली साळवी, नम्रता कोळी आणि मिलिंद साळवे यांना उमेदवारी दिली आहे. बाजारपेठेचा हा परिसर असल्याने या भागातून व्यापाऱ्यांना प्रतिनिधित्व द्यावे, अशी मागणी व्यापारी वर्गाने केली होती; मात्र शिवसेना आणि भाजपनेही व्यापाऱ्यांना उमेदवारी न दिल्याने नाराज झालेल्या व्यापारी कोअर कमिटीचे सदस्य आणि जैन मंदिर समितीचे अध्यक्ष महेंद्र जैन यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता; मात्र आपली नाराजी दूर झाल्याचा दावा करत देशाला विकासाचा मार्ग दाखवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आम्ही राहणार असल्याचे जैन यांनी सांगितले.

Web Title: BJP with traders