"उमेदवार नाहीत तरीही आयजीच्या जीवावर बायजी उदार असेच संजय राऊत यांचे चालू आहे. दिल्लीशी त्यांचा संबंध काय?"
मुंबई : संजय राऊत (Sanjay Raut) वास्तूशास्त्रज्ञ किंवा ज्योतिषी असतील त्यांनी तो धंदा करावा. वर्षा बंगल्यावर राहायला जाण्याबाबत मुख्यमंत्र्यांना सल्ला देण्याच्या फंदात पडू नये, असे उत्तर भाजपचे विधान परिषद गटनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी दिले.