"अतुल भातखळकर थोबाडावर आपटले"; मनसेचा भाजपवर 'व्हिडीओ'वार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raj-Thackeray-Atul-BJP

"आमचा "राजा" तुमच्या "राजा "सारखा खोट बोलत नाही"; मनसेचा टोला

"अतुल भातखळकर थोबाडावर आपटले"; मनसेचा भाजपवर 'व्हिडीओ'वार

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) सध्या महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) विरूद्ध भाजप असा संघर्ष रंगला आहे. भाजपचे नेते वेळोवेळी ठाकरे सरकारच्या निर्णयांवर भाष्य करताना किंवा टीका-टिपण्णी करताना दिसतात. पण गेल्या काही दिवसात एक वेगळंच द्वंद्व पाहायला मिळतंय. भाजपचे एक आमदार विरूद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेना (BJP vs MNS) असा एक सामना रंगल्याचे चित्र आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांच्याबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS chief Raj Thackeray) यांनी एक विधान केले होते. या विधानावर भातखळकर यांनी आक्षेप घेतला होता. पण त्यानंतर मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी थेट पुराव्यादाखल व्हिडीओ (Video) पोस्ट केला आणि भातखळकर यांची बोलती बंद केल्याची चर्चा आहे. (BJP vs MNS Raj Thackeray Sandeep Deshpande post Video slams BJP Atul Bhatkhalkar)

भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी विधानसभा निवडणुकीसाठी मनसे पक्षाकडून तिकीट मागितलं होतं, असा खळबळजनक दावा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये केला. 'मनसेमध्ये अनेक चांगले नेते होते. पण पक्षबांधणीसाठी हा नेत्यांची आवश्यकता असताना हे नेते पक्ष सोडून गेले', या संदर्भात राज यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर राज यांनी भातखळकरांबद्दलचं विधान केलं होते.

राज ठाकरेंचा हा दावा भातखळकर यांनी खोडून काढला. "राज ठाकरे यांचा आरोप खोटा आणि असत्य आहे. या पूर्वीही त्यांनी असे आरोप केले आहेत. २००९च्या गोष्टीचा संदर्भ त्यांना २०२१ला द्यावासा वाटतो म्हणजे माझं राजकीय वजन भरपूर वाढलेलं दिसतंय", अशी प्रतिक्रिया भातखळकर यांनी दिली होती. यावर मनसेचे संदीप देशपांडे यांनी थेट पुराव्यादाखल एक व्हिडीओच पोस्ट केला.

पाहा हा व्हिडीओ-

राज ठाकरे म्हणाले होते, 'माझ्या पक्षात भाजपचं कोणी तिकीट मागायला आलं तर मी भाजप नेत्यांना सांगायचो आणि त्या उमेदवाराला परत पाठवायचो. पण भाजपने मनसेच्या बाबतीत तसं केलं नाही.' ही गोष्ट भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी मान्य केल्याचा व्हिडीओ संदीप देशपांडे यांनी पोस्ट केला. तसेच, अतुल भातखळकर थोबाडावर आपटले, अशा आशयाचा व्हिडीओदेखील पोस्ट केला.