

Ambarnath Power Struggle BJP Issues Whip To NCP Corporators
Esakal
अंबरनाथ, ता. ११ (वार्ताहर) अंबरनाथ नगर परिषदेतील सत्तासंघर्षाने पुन्हा नवे वळण घेतले आहे. सोमवारी होणाऱ्या उपनगराध्यक्ष निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या चारही नगरसेवकांना व्हीप बजावून भाजप समर्थित उमेदवाराला मतदान करण्याचा स्पष्ट इशारा दिला आहे. व्हीपचे उल्लंघन झाल्यास राष्ट्रवादीच्या चारही नगरसेवकांवर सहा वर्षांची अपात्रतेची कारवाई करण्यात येईल, असा इशारा भाजपने रविवारी दिला.