esakal | २५ फेब्रुवारीपासून भाजपचा सरकार विरोधात एल्गार, ४०० ठिकाणी करणार आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

२५ फेब्रुवारीपासून भाजपचा सरकार विरोधात एल्गार, ४०० ठिकाणी करणार आंदोलन

२५ फेब्रुवारीपासून भाजपचा सरकार विरोधात एल्गार, ४०० ठिकाणी करणार आंदोलन

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : येत्या २५ फेब्रुवारीला भाजप संपूर्ण महाराष्ट्रात राज्यव्यापी धरणं आंदोलन करणार आहे. याबाबत महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांना माहिती दिली.  राज्यभरात तब्बल ४०० ठिकाणी भाजपकडून धरणं आंदोलन करण्यात येणार आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार शेतकऱ्यांकडे आणि सामान्य जनतेकडे दुर्लक्ष करतंय. ठाकरे सरकार नागरिकत्व सुधारणा कायदा आणि NPR ला विरोध करतंय असा आरोप भाजपकडून केला जातोय. याच पार्श्वभूमीवर भाजप धरणं आंदोलन करणार आहे.

मोठी बातमी - मुकेश अंबानींपाठोपाठ 'हे' आहेत भारतातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती...

काय म्हणाले चंद्रकांत पाटील:
 
"भाजप संपूर्ण राज्यभरात ४०० ठिकाणी आंदोलन करणार आहे. आम्ही महाविकास आघाडीच्या अपयशाबद्दल जनतेला सांगणार आहोत. तसंच ठाकरे सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरली आहे. हे सरकार नागरिकत्व सुधारणा कायदा आणि NPR ला विरोध करत आहे म्हणूनच आम्ही संपूर्ण राज्यभरात धरणं आंदोलन करणार आहोत. आम्ही आमची विचारधारा सोडली नाही. महाविकास आघाडीचं सरकार हे त्यांच्यातील मतभेदांमुळेच पडणार आहे", असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हंटलय. "महाविकास आघाडीचे सरकार अवास्तविक आणि अनैसर्गिक आहे तसंच, यापुढे भाजप सर्व निवडणुका स्वत:च्या भरवशावर लढवणार आहे" असं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी म्हटलंय.

मोठी बातमी - आता पेट्रोल पंपावरच विकत घ्या नवी कोरी कार, कशी ? वाचा बातमी...

दरम्यान राजू शेट्टी यांनी चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय. "भाजपचं सरकार स्वप्नातच आहे आणि स्वप्नातच राहणार, उन्हाळा वाढला आहे म्हणून धरणं आंदोलनाला जाताना भाजप नेत्यांनी सोबत छत्री घेऊन यावं" असा खोचक टोला राजू शेट्टी यांनी भाजपला लगावलाय.

त्यामुळे आता २५ फेब्रुवारीला होणारं भाजपचं धरणं आंदोलन किती यशस्वी होतं आणि महाविकास आघाडीकडून या आंदोलनावर काय प्रतिक्रिया येते हेच बघाव लागणार आहे.     

bjp will start agitation against mahavikas aaghadi from 25th February on 400 locations