आता पेट्रोल पंपावरच विकत घ्या नवी कोरी कार, कशी ? वाचा बातमी... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आता पेट्रोल पंपावरच विकत घ्या नवी कोरी कार, कशी ? वाचा बातमी...

आता पेट्रोल पंपावरच विकत घ्या नवी कोरी कार, कशी ? वाचा बातमी...

मुंबई - देशातील अग्रगण्य कार निर्मिती करणारी कंपनी टाटा मोटर्सने आपल्या कार्सची विक्री वाढवण्यासाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. एक नवीन योजना टाटा मोटर्सने तयार केली आहे. कंपनीने घरगुती बाजारात १० टक्के विक्रीचं लक्ष्य निश्चित केलं आहे आणि त्यासाठीच ही नवी योजना बनवली आहे. विशेष म्हणजे ऑटोमोबाईल सेक्टरला आर्थिक मंदीचा मोठा फटका बसलाय. अशात टाटा मोटर्सने कर विक्रीसाठी ही नवीन युक्ती लढवली आहे. 

मोठी बातमी - तब्बल ५९ वर्षानंतर येणार 'हा' योग; यंदाची महाशिवरात्र असणार विशेष...

नव्या योजनेअंतर्गत टाटा मोटर्स कडून छोट्या शहरांमध्ये नवीन डिलर्स तयार केले जाणार आहेत. मात्र यामध्ये विशेष म्हणजे कंपनीकडून इंधन विक्रेत्यांसोबत भागीदारी करण्यावर जोर दिला जात आहे. छोट्या शहरांतील पेट्रोल पंपांवर गाड्यांचं शोकेस केलं जाणार आहे. तिथूनच गाड्यांची थेट विक्री केली जाणार आहे. टाटा मोटर्सचे मार्केटिंग प्रमुख  विवेक श्रीवास्तव यांनी या योजनेला प्रायोगिक तत्वावर ‘इमर्जिंग मार्केट आउटलेट’ असं नाव दिलं जाऊ शकतं असं म्हटलंय.

मोठी बातमी - मंत्र्यांच्या बैठकीआधी नवाब मलिक यांचं 'मोठं' वक्तव्य, म्हणालेत... 

"पेट्रोल पंपावरील कंपनीच्या शोरुममध्ये एक-दोन छोट्या किंवा लोकप्रिय कार डिस्प्लेसाठी ठेवल्या जाणार आहेत. पेट्रोल पंप किती मोठा आहे यावर या गाड्यांची संख्या ठरवली जाणार आहे. छोट्या शहरांमध्ये मोठे शोरुम उभारणं तशी मोठी समस्या आहे,  त्यामुळे केवळ काही लोकप्रिय गाड्याच शोकेससाठी ठेवल्या जातील. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 400 शोरूम्स तयार करण्यात आले आहेत. आता दरवर्षी अशाप्रकारे 100 आउटलेट उभारणं हे कंपनीचं लक्ष्य आहे”, अशी माहिती श्रीवास्तव यांनी दिलीये.

मोठी बातमी - तुमच्यावर नजर ठेवणारं खतरनाक 'हे' ऍप गुगलने हटवलं..

आता टाटा मोटर्सची ही योजना ग्राहकांना किती रुचते आणि आवडते हेच बघाव लागणार आहे.   

now buy new car on petrol pum itself new idea by tata motors

loading image
go to top