मिरा-भाईंदर पालिका प्रभाग समितीवर भाजपचे एकहाती वर्चस्व

संदीप पंडित
Tuesday, 27 October 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच प्रभाग समिती सभापतिपदासाठी ऑनलाईन पद्धतीने निवडणूक घेण्यात आली आहे. प्रत्येक नगरसेवकाने ऑनलाईन पद्धतीनेच आपल्या मतदानाचा हक्क बजावला.

भाईंदर : मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या सहा प्रभागांच्या सभापतिपदासाठी मंगळवारी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत भाजपने आपले वर्चस्व कायम राखले आहे. निवडणुकीपूर्वी दोन प्रभागातील सभापतींची बिनविरोध निवड झाली होती. चर्चेत असलेल्या वैशाली रकवी यांची प्रभाग 1 समितीवर निवड झाली आहे. गेल्या वेळी एका प्रभाग समितीवर शिवसेनेचे वर्चस्व होते. या निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर यांनी काम पहिले. 

 नक्की वाचा : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्‍यता; BMC कडून 50 हजार खाटांची तयारी 

मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती सभापतिपदाकरिता ऑनलाईन पद्धतीने मंगळवारी (ता. 27) निवडणूक घेण्यात आली होती. प्रभाग समिती क्र. 2 मध्ये रक्षा सतीश भुपतानी आणि प्रभाग समिती क्र. 6 मध्ये सचिन केसरीनाथ म्हात्रे यांची बिनविरोध निवड यापूर्वीच झालेली आहे. उर्वरित चार प्रभाग समिती सभापतिपदासाठी ऑनलाईन पद्धतीने निवडणूक घेण्यात आली असता प्रभाग क्र. 1 मधून वैशाली रकवी यांची निवड झाली आहोॅ; तर प्रभाग समिती क्र. 3 मधून मीना यशवंत कांगणे, प्रभाग समिती क्र. 4 मधून दौलत तुकाराम गजरे आणि प्रभाग समिती क्र. 5 मधून हेतल रतिलाल परमार यांचा विजय झाला आहे. 

हेही वाचा : कंगनाच्या अडचणी वाढणार? कंगनावर कारवाईसाठी वकिलांचे महाधिवक्त्यांना पत्र

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच प्रभाग समिती सभापतिपदासाठी ऑनलाईन पद्धतीने निवडणूक घेण्यात आली आहे. प्रत्येक नगरसेवकाने ऑनलाईन पद्धतीनेच आपल्या मतदानाचा हक्क बजावला असून या सहाही प्रभाग समितीवर भाजपने आपले वर्चस्व कायम राखले आहे. विजयी झालेल्या या उमेदवारांचे भाजपच्या वतीने जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे व सभागृह नेता प्रशांत दळवी यांनी अभिनंदन केले आहे. 

(संपादन : वैभव गाटे)

BJP win Mira-Bhayander Municipal Corporation Ward Committee election


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP win Mira-Bhayander Municipal Corporation Ward Committee election