भाजपाच्या कार्यकर्त्यांचे महापालिका कार्यालयात ठिय्या आंदोलन

तीन प्रभाग मिळुन एकच मलनिस्सारण गाडी
Mumbai
Mumbaisakal

डोंबिवली : वारंवार मागणीकरूनही सांडपाणी साफ करणारी मलनिस्सारण गाडी येत नसल्याने अखेर बुधवारी भाजपाच्या (BJP) कार्यकर्त्यांनी डोंबिवली (Dombivali) विभागीय कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. तीन प्रभाग मिळून एकच मलनिस्सारण गाडी पालिकेकडे (Municipal) असेल, नादुरुस्त गाड्यांची दुरुस्ती करता येत नसेल? तर मलनिस्सारणासाठी उपलब्ध होणार निधी जातो कुठे ? असा सवाल यावेळी कार्यकर्त्यांनी केला.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात बुधवारी भाजपाचे माजी नगरसेवक निलेश म्हात्रे, मुकुंद पेडणेकर, राजन आभाळ यांनी ठिय्या आंदोलन केले. पावसाळ्यात मलनिस्सारण वाहिन्या तुंबून ते पाणी रस्त्यावर येते. यामुळे सोसायट्याच्या टाक्या, परिसरातील मलनिस्सारण वाहिन्या साफ करण्यासाठी मलनिस्सारण गाडीची मागणी केली असता, वारंवार पाठपुरावा करूनही गाडी मिळत नाही. गाडी मिळत नसल्याने आमच्यावर आंदोलन करण्याची वेळ आली आहे. सध्या महापालिकेकडे ग, ह व फ प्रभाग क्षेत्र मिळून एकच गाडी आहे. प्रत्येक प्रभागास एक गाडी आहे. मात्र ग व फ प्रभागाची गाडी बिघडल्याने बंद आहेत. ह प्रभागातील गाडीवर ग व फ चाही भार येत आहे. यामुळे वार ठरवून देण्यात आले आहेत. मात्र एका दिवसात किती टाक्या ही गाडी साफ करू शकते याचा विचार झाला पाहिजे.

Mumbai
PM योजनेतील एक कोटीचा हप्ता थकीत

अमृत योजनेतील ड्रेनेज चे काम 90 टक्के पूर्ण झाले असल्याचा दावा काही अधिकारी करत आहेत. हे काम खरेच झाले आहे का याची खातरजमा करावी. आणि काम झाले नसेल तर दावा करणाऱ्या अधिकऱ्यांविरोधात तक्रार दाखल करावी अशी मागणी यावेळी माजी नगरसेवकांनी केली. याची दखल घेत पालिका प्रभागक्षेत्र अधिकाऱ्यांनी गुरुवारी भाजपाच्या कार्यकर्त्यां सोबत बैठक घेऊन या समस्येवर तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन देताच कार्यकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com