esakal | PM योजनेतील एक कोटीचा हप्ता थकीत; लाभार्थ्यांची 'लोकशाही'कडे धाव
sakal

बोलून बातमी शोधा

Prime Minister Housing Scheme

नवीन घर होणार म्हणून आम्ही घरे पाडून भाड्याच्या घरात राहण्यासाठी गेलो आहोत. त्याचे भाडे भरणेही मुश्कील झाले आहे.

PM योजनेतील एक कोटीचा हप्ता थकीत

sakal_logo
By
सचिन शिंदे/सिद्धार्थ लाटकर

कऱ्हाड (सातारा) : तीन लाखांपेक्षा उत्पन्न कमी असलेल्यांसाठी केंद्र शासनाने शहरी भागासाठीच्या शहरी पंतप्रधान घरकुल आवास योजनेतील (Prime Minister Housing Scheme) ९१ लोकांचा एक कोटी ३६ लाखांच्या केंद्राचा हप्ता दोन वर्षांपासून थकीत आहे. त्या योजनेतून घरे पाडून बांधणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. तो प्रश्न मार्गी लावा, अशी मागणी योजनेतील लाभार्थी नागरिकांनी लोकशाही आघाडीकडे (Lokshahi Aghadi) केली. लोकशाही आघाडीचे नेते सुभाष पाटील (Lokshahi Aghadi leader Subhash Patil), गटनेते सौरभ पाटील यांच्याशी चर्चा केली. (91 Citizens Of PM Housing Scheme Have Not Paid 1 Crore Installment Of The Scheme bam92)

पाडलेली घरे अर्धवट आहे, त्यात लॉकडाउनमुळे (Corona Lockdown) मोठी कठीण स्थिती झाली आहे. त्यामुळे तो प्रश्न मार्गी लावण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे. नवीन घर होणार म्हणून आम्ही घरे पाडून भाड्याच्या घरात राहण्यासाठी गेलो आहोत. त्याचे भाडे भरणेही मुश्कील झाले आहे. आर्थिक कोंडीत सापडलेल्यांची घरबांधणी अर्धवट राहिली आहे. नवीन घरांच्या २०९ लाभार्थ्यांपैकी ९१ जणांची प्रत्यक्ष घरबांधणी सुरू आहे. त्यांचाच केंद्राकडून येणारा हप्ता दीड वर्षापासून थकला आहे.

हेही वाचा: शिवेंद्रसिंहराजे पराभवाचा वचपा काढणार?

त्यामुळे अन्य लोकही घरबांधणीचे धाडस करताना दिसत नाहीत. राज्य शासनाचा पूर्ण निधी पालिकेस प्राप्त झाला आहे. मात्र, केंद्राचा निधी न मिळाल्याने पालिकेसमोरही योजना पूर्ण करण्याचे आव्हान आहे, अशी स्थिती मांडून त्यांनी हा प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली. सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या मदतीने प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन सुभाष पाटील व सौरभ पाटील यांनी या वेळी दिले.

हेही वाचा: झेडपीत 137 कर्मचाऱ्यांना पदोन्नती; 'आरोग्य'तील 60 जणांचा समावेश

केंद्राकडून दमडी नाही

पालिकेने शहरातील २०९ नागरिकांसाठी शहरी पंतप्रधान घरकुल आवास योजना हाती घेतली. दोन वर्षांपूर्वी पालिकेने अर्ज मागविले. ज्यांचे वार्षिक उत्पन्न तीन लाखांपेक्षा कमी आहे. घर नाही त्यांना फायदा होणार होता. त्या वेळी अर्जांचे पालिकेने तीन वेगवेगळे डीपीआर केले. त्यात पहिल्या प्रकल्पात ५०, दुसऱ्यात १३७, तर तिसऱ्यात २२ जणांच्या घरांचा प्रस्ताव झाला. त्याला मंजुरीही मिळाली. या प्रकल्पासाठी राज्याचा दोन कोटी नऊ लाखांचा निधी पालिकेस प्राप्त झाला. जुने घर पाडून नवीन घरे बांधण्याचे काम हाती घेणारे आर्थिक कोंडीत आहेत. केंद्राकडून रुपयाही आलेला नाही.

91 Citizens Of PM Housing Scheme Have Not Paid 1 Crore Installment Of The Scheme bam92

loading image