Mumbai Crime : भाजप युवा नेता झाला बनावट टीसी? पोलिसांनी गुन्ह्याची केली नोंद

कसारा-सीएसएमटी धावत्या लोकलमध्ये फर्स्ट क्लासच्या डब्यात घुसून, टीसी असल्याचे भासवून, जबरदस्तीने प्रवाशांच्या तिकीट तपासणी करणाऱ्या बनावट तिकीट तपासनीसाला अटक केली.
bogus ticket checker
bogus ticket checkersakal

मुंबई - कसारा-सीएसएमटी धावत्या लोकलमध्ये फर्स्ट क्लासच्या डब्यात घुसून, टीसी असल्याचे भासवून, जबरदस्तीने प्रवाशांच्या तिकीट तपासणी करणाऱ्या बनावट तिकीट तपासनीसाला अटक केली आहे. हरिओम विजय बहादूर सिंह (वय-२१ वर्ष) असे आरोपीचे नाव आहे. त्यांच्याकडे भारतीय रेल्वेचे बनावट टीसीचे ओखळपत्र आणि दिंडोशी मतदार संघातील भारतीय जनता पक्षाचे युवा अध्यक्षाचे ओळखपत्र आढळून आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (ता. २४) दुपारी ३ वाजून ४० मिनिटांच्या सुमारास मध्य रेल्वेचे मुख्य टिकिट निरीक्षक प्रमोद एच सरगईया कर्तव्यावर असताना कसारा-सीएसएमटी धावत्या लोकलमध्ये फर्स्ट क्लासच्या डब्यात टीसी असल्याचे भासवून, प्रवाशांच्या तिकीट तपासणी करत असल्याचे निदर्शनात आले.

तेव्हा मुख्य टिकिट निरीक्षक प्रमोद यांना तो बनावट टीसी असल्याच्या संशयावरून त्याला पकडले. त्यानंतर दिवा स्थानकांवर उतरवून हेड कॉन्स्टेबलने आणि मुख्य तिकीट निरीक्षकांनी त्यांची सखोल चौकशी आणि विचारपूस केली असता त्यांने आपले नाव हरिओम विजय बहादूर सिंग (वय २१ वर्षे) सांगितले.

त्याच्याकडे बनावट टीसीचे ओळखपत्र आणि दिंडोशी मतदार संघातील भारतीय जनता पक्षाचे युवा अध्यक्षाचे बनावट ओळखपत्रही त्यांच्याकडे सापडले. त्यानंतर ह्या बनावट टीसीला असल्याचे स्पष्ट झाल्यावर आरोपीला ठाणे लोहमार्ग पोलिसाकडे संपूर्द केले. तेथे त्याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला होता. मात्र, सदर घटना डोंबिवली हद्दीत घटना घडल्याने आरोपीला पुढील चौकशीसाठी गुरुवारी रात्री डोबिवली लोहमार्ग पोलिसांकडे पाठवण्यात आले.

डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी हरिओम विजय बहादूर सिंग ह्या बनावट तिकीट तपासणीसाला कोर्ट हजर केले. आरोपीला कोर्टाने २७ ऑगस्टपर्यत पोलीस कोठवडी सुनावली आहे. लोहमार्ग पोलीस बनावट टीसीकडे सापडलेले रेल्वेचे ओळखपत्र आणि इतर कागदपत्राचा तपास करत असल्याची माहिती डोबिवली लोहमार्ग पोलिसांनी सकाळला दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com