esakal | ठाण्याच्या धर्तीवर कल्याणमधील प्रयोगही यशस्वी
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

"ठाण्याच्या" धर्तीवर "कल्याण"मधील प्रयोगही यशस्वी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली - लोकलबंद (Local) असल्याने चाकरमानी खासगी (Private) वाहनाने प्रवास करतात. यामुळे खासगी बसेसचीही संख्या गेल्या वर्षभरात वाढली आहे. या खासगी बसेसमुळे कल्याण पश्चिम (kalyan) स्टेशन (Station) परिसरात सायंकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. ही कोंडी फोडण्यासाठी वाहतूक विभागाने सायंकाळचे 3 तास स्टेशन परिसरात खासगी बसना प्रवेश बंद (Close) करीत वाहतुकीत बदल केला आहे.

ठाण्याच्या (Thane) धर्तीवर 23 ऑगस्ट पासून हा प्रयोग राबविला जात असून तो 70 टक्के कोंडी फोडण्यास यशस्वी झाला असल्याची माहिती कल्याण (Kalyan) वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस (Police) निरीक्षक सुखदेव पाटील (Sukhdev Patil) यांनी दिली.

मुंबई, ठाणे, भिवंडी, नवी मुंबई परिसरातून नोकरदार वर्गाला घेऊन येणाऱ्या खासगी बसेसची संख्या वाढली आहे. कल्याण पश्चिमेतील स्टेशन परिसरात रेल्वे स्टेशनमधून बाहेर पडणारे प्रवासी, एसटी स्टँड, रिक्षा थांबा यामुळे वाहतूक कोंडी होत असताना त्यात स्टेशन परिसरात सुरू असलेले स्मार्ट सिटीचे काम व खासगी बसेसची भर पडल्याने वाहतुकीवरील ताण वाढला होता. ठाण्यातही अशी समस्या निर्माण होत असल्याने काही वर्षांपूर्वी ठाणे वाहतूक विभागाने स्टेशन परिसरातील खासगी बसेसची वाहतूक बदल केला होता.

त्याच धर्तीवर कल्याण स्टेशन परिसरात हा प्रयोग राबविण्याचे वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील, कल्याणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुखदेव पाटील यांनी ठरविले. त्यानुसार सायंकाळी 6 ते रात्री 9 या वेळेत खासगी बसेसना स्टेशन परिसरात बंदी करत पर्यायी मार्ग देण्यात आला. 23 ऑगस्ट पासून हा प्रयोग राबविला जात असून यामुळे स्टेशन परिसरातील 70 टक्के कोंडी फोडण्यासाठी त्याचा उपयोग झाला असल्याचे पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा: रिक्षा चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या कल्याण पोलिसांनी मुसक्या आवळल्या

कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भागात स्मार्ट सिटीची कामे सुरू झाल्यापासून रेल्वे स्थानक परिसरातील वलीपीर रस्ता भागातील मुख्य रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. या रस्त्याने जाणारी वाहने लोकग्राम वस्तीमधून पत्रीपूल दिशेने वळविण्यात आली आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे.

*खासगी बसमधून दररोज 5 ते 7 हजार प्रवासी प्रवास करतात. स

*सायंकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत खासगी बसेसना वेळ आणि शहरातील कमी वर्दळीच्या ठिकाणी थांबे निश्चित करण्यात आले आहेत.

*खासगी बसना कल्याण स्टेशन परिसरातील व्यापारी पेठचा रस्ता सायंकाळी 3 तासासाठी बंद केला आहे.

हेही वाचा: 'शेतकऱ्यांचा खासगी सावकारीचा फास मोडून काढू' - बी. जी. शेखर

*खासगी कंपनीच्या बससाठी दुर्गाडी चौक, मुरबाड रस्त्यावरील शासकीय विश्रामगृह, सम्राट चौक, विठ्ठलवाडी, सनई मंगल कार्यालय, लाल चौकी, कृषी उत्पन्न बाजार समिती येथे थांबा देण्यात आला आहे.

*प्रवासी उतरल्यानंतरही या बस शहरात न येता आल्या मार्गे परत जातील.

*भिवंडीकडून येणाऱ्या वाहनांना गोविंदवाडी बायपास मार्गे कल्याण पत्रीपूल एपीएमसीकडून सिनेहॉलपर्यंत जाऊन तिथूनच माघारी जावे लागेल.

*पडघ्याकडून येणाऱ्या वाहनांना आधारवाडी चौक, दुर्गाडी मार्गे गोविंदवाडी बायपासवरून सिनेहॉलपर्यंत येऊन प्रवाशांना उतरवावे आणि तिथून परत जावे लागेल.

*विठ्ठलवाडीकडे जाणाऱ्या बसेसना गोविंदवाडी बायपास पत्रीपूल, चक्कीनाका श्रीराम चौकातून इच्छित स्थळी आणि उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथकडे जाणाऱ्या बसेसनी बिर्ला कॉलेजमार्गे शहाड पुलावरून यू टर्न घेऊन चोपडा कोर्टमार्गे इच्छित स्थळी मार्गस्थ व्हावे लागत आहे.

loading image
go to top