भाजपच्या अब्जाधीश उमेदवाराला मंदीचा फटका 

भाजपच्या अब्जाधीश उमेदवाराला मंदीचा फटका 

मुंबई : घाटकोपर पूर्व येथील भाजपचे उमेदवार बांधकाम व्यावसायिक पराग शहा यांना आर्थिक मंदीचा जबरदस्त फटका बसला असल्याचे समोर आले आहे. 2017 च्या महापालिका निवडणुकीत शहांकडे सुमारे 670 कोटी रुपयांची संपत्ती होती; मात्र सध्या त्यांची संपत्ती 500 कोटी रुपयांवर आली असल्याने अवघ्या दोन वर्षांत त्यांच्या संपत्तीत सुमारे 150 कोटी रुपयांची घट झाली आहे. विशेष म्हणजे शेअर बाजारातील गुंतवणुकीचा त्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. 

शहा यांचे शिक्षण बी.कॉम.पर्यंत झाले असून व्यावसायिक आणि गुंतवणूकदार अशा दोन मार्गांनी त्यांनी उत्पन्नाचे मार्ग दाखवले आहेत. 2017 मध्ये ते मुंबईसह महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत राजकरणी ठरले होते. मात्र, सध्या त्यांच्या संपत्तीत प्रचंड घट झाली आहे. सर्वाधिक घट ही शेअर, म्युचिअल फंड, बॉण्ड; तसेच इतर गुंतवणुकीत झाली आहे. 2017 मध्ये त्यांना या सर्वात 501 कोटी रुपयांची गुंतवणूक होती. ती, यंदा 350 कोटींवर आली आहे. 

केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर झाल्यापासून शेअर बाजारात प्रचंड घसरण झाली आहे. तसेच, गृहनिर्माण उद्योगालाही मोठा फटका बसला आहे. तरीही मंदी नसल्याचा दावा भाजप सरकारकडून केला जात आहे. 

तरीही श्रीमंतच 
मुंबईत सर्वात श्रीमंत उमेदवार भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा होते. लोढाही बांधकाम व्यावसायिक असून त्यांनी 441 कोटी संपत्ती जाहीर केली होती. मात्र, पराग शहा यांनी सुमारे 500 कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली असल्याने शहा हे मुंबईतील सर्वांत श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. 

----- 
असा झाला घाटा (रुपये कोटीत) 
संपत्ती - 2017---2019 
पराग शहा -392-271.86 
पत्नी - 239----194.77 
कुटुंब - 41----33.98 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com