सीबीएससी इंग्रजी शाळा दाखवून मराठी माणसांना भुलवण्याचे काम: भाजपची टीका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CBSE
सीबीएससी इंग्रजी शाळा दाखवून मराठी माणसांना भुलवण्याचे काम: भाजपची टीका

सीबीएससी इंग्रजी शाळा दाखवून मराठी माणसांना भुलवण्याचे काम: भाजपची टीका

मुंबई : सत्ताधारी शिवसेनेचे(shivsena) मराठी प्रेम 'बेगडी' असून त्यांना आणि त्यांच्या मित्रांना फक्त सीबीएससी (CBSE)च्या इंग्रजी शाळा दाखवून, पीआर-जाहिरातबाजी(PR-ADVERTISING) करून लोकांना भुलवायचे आहे, अशी बोचरी टीका पालिकेच्या शिक्षण समितीचे सदस्य प्रतीक कर्पे यांनी केली आहे. महापालिकेच्या(BMC) इंग्रजी माध्यमांच्या शाळांसाठी निवड प्रक्रिया पूर्ण होऊनही फक्त मराठीतून शालेय शिक्षण घेतल्याने नोकरीसाठी डावललेल्या उमेदवारांनी आझाद मैदानात(Azad Maidan) आंदोलन सुरू केले आहे. भाजपा गटनेते प्रभाकर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विनोद मिश्रा, भालचंद्र शिरसाट, शिक्षण समिती सदस्य प्रतीक कर्पे, पंकज यादव यांच्या शिष्टमंडळाने या उमेदवारांची भेट घेतली.

हेही वाचा: ज्येष्ठ गायक अभिनेते पंडित रामदास कामत यांचं निधन

या सुमारे दीडशे उमेदवारांचे शालेय शिक्षण मराठीतून झाल्याने त्यांना डावलले जात आहे. दोन वर्षे या उमेदवारांचा संघर्ष सुरू असून एक वर्षभर आम्हीही शिक्षण समितीत या विषयाचा पाठपुरावा करतो आहोत. मुळात सत्ताधारी शिवसेनेचे मराठीप्रेम बेगडी आहे, त्यांना आणि त्यांच्या मित्रांना फक्त सीबीएससी शाळा, इंग्रजी मिडियम वगैरे पीआर व जाहिरातबाजी करून मुंबईकरांना भुलवायचे आहे. पण त्यांना मराठी माणसांना न्याय द्यायचा नाहिये व मराठी लोकांना मुंबईत राहू द्यायचे नाहीये. या कटामुळेच या उमेदवारांना नोकरी मिळत नाही, असा आरोप शिक्षण समिती सदस्य प्रतीक कर्पे यांनी यावेळी केला.

हेही वाचा: सुली डील्सचा मास्टरमाइंड ओंकारेश्वर ठाकूर याला इंदौरमधून अटक

दहावीपर्यंत मराठी माध्यमातून शिकलेल्या मुलांना डावलणे म्हणजे मराठी माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या मुले आणि पालकांचे मनोधैर्य खच्चीकरण करण्याचा हा प्रकार आहे. या उमेदवारांचे दहावीनंतरचे व्यावसायिक शिक्षण इंग्रजीतुन झाले असतानाही त्यांना डावलण्यातून शिवसेनेचा मराठी विषयीचा आकस दिसून येतो. केवळ मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मराठी माणसाच्या हक्काबाबत जागरूक होणारी शिवसेना मराठी माणसाच्या नोकऱ्या कशा डावलू शकते, अशी विचारणाही यावेळी भाजप नेत्यांनी केली. याबाबत शिक्षण समितीमधील भाजप सदस्यांनी वारंवार समितीच्या बैठकीत आवाज उठवूनही समिती अध्यक्ष श्रीमती संध्या दोशी यांनीही काणाडोळा केला, अशी टीका कर्पे यांनी केली. महाराष्ट्रामध्ये भूमिपुत्रांवर अन्याय करण्याचा कोणी प्रयत्न केला तरी गाठ भाजपशी आहे, हे सत्ताधाऱ्यांनी कायम लक्षात ठेवावे असा इशाराही शिंदे यांनी दिला.

Web Title: Bjps Criticism In Shivsena Cbsc English School Work To Confuse Marathi People

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top