विरोधी पक्ष नेते पदासाठी भाजपचा सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय; मुंबई महापालिकेतील राजकारण तापले

समीर सुर्वे
Monday, 21 September 2020

महापालिकेतील विरोधी पक्ष नेते पद काँग्रेसकडे कायम ठेवण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाला भाजप सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहे.

मुंबई : महापालिकेतील विरोधी पक्ष नेते पद काँग्रेसकडे कायम ठेवण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाला भाजप सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहे. उच्च न्यायालयाच्या  निर्णयामुळे भाजपने महापौर किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात मांडण्यात आलेल्या अविश्वासाच्या ठरावालाही धक्का बसला असल्याचे मानले जात आहे.

नियम पाळा अन्यथा कोरोनाची दुसरी लाट; टास्क फोर्सच्या सदस्य मनिषा म्हैसकर यांचा इशारा

महापालिकेच्या 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजप दुसर्या क्रमांकाचा पक्ष होता. राज्यात युतीची सत्ता असली तरी महापालिकेत शिवसेना, भाजप एकत्र नव्हते. मात्र, भाजपने विरोधी पक्ष नेते पदावरही दावा सांगितला नव्हता. त्यामुळे तिसर्या क्रमांकाच्या काँग्रेस पक्षाला हे पद मिळाले. मात्र, राज्यात महाआघाडी स्थापन झाल्यावर भाजपने विरोधी पक्ष नेते पदावर दावा सांगितला.  महापौर किशोरी पेडणेकर यांनी हा दावा फेटाळून लावला. त्यावर भाजपने न्यायालयात दाद मागितली. मुंबई उच्च न्यायालयानेही भाजपाचा हा दावा नाकरला असून कॉंग्रेसचे विरोधी पक्षनेते पद कायम ठेवले आहे. या विरोधात आता भाजप सर्वेाच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती नगरसेवक आणि प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांनी सांगितले. दरम्यान, विरोधी पक्ष नेते पदासाठी मुंबई महापालिकेत काही दिवसांपासून वातावरण तापले आहे. 

आरे बचाव आंदोलनातील विद्यार्थ्यांची फरफट; गुन्ह्यांमुळे शैक्षणिक कर्ज, नोकरी, पासपोर्टसाठी अडचणी

अविश्वास ठरावाला धक्का?
भाजपने महापौरांविरोधात अविश्वासाचा ठराव मांडला आहे. मात्र उच्च न्यायालयाने भाजपचा विरोधी पक्ष नेते पद देण्याच्या मागणीचा दावा फेटाळला आहे. या  निर्णयामुळे अविश्वास ठरावालाही धक्का बसण्याची शक्यता आहे.

-----------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJPs decision to go to Supreme Court for Leader of Opposition