मनसेच्या मोर्चास आमचा पाठिंबा; भाजपच्या मोठ्या नेत्याचा खुलासा

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 9 February 2020

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मनसेच्या मोर्चाला भाजपचा पाठिंबा असल्याची माहिती नेते प्रवीण दरेकर यांनी दिली.

मुंबई : मुंबईमध्ये आज मनसेच्या महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. गिरगाव ते आझाद मैदान हा मोर्चा निघणार आहे. हा मोर्चा बांग्लादेशी व पाकिस्तानी घुसखोरांच्या विरोधात आहे. त्यांना देशातून बाहेर घालविण्यासाठी मोर्चाचे आयोजन केल्याचे मनसे सैनिक सांगत आहेत. या मोर्चास भाजपचा पाठिंबा असल्याची माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दिली.

मोठी बातमी - मनसेत इनकमिंग... 'या' नेत्यांनी केला 'मनसे'प्रवेश

या भव्य मोर्चासाठी राज्यभरातून मनसैनिक मुंबईकडे रवाना झाले आहेत. मोर्चानंतर अध्यक्ष राज ठाकरे सभेत मनसैनिकांना संबोधित करणार आहेत. या सभेसाठी आझाद मैदानात जय्यत तयारी करण्यात आली आहे. या मोर्चासाठी केवळ मुंबईतूनच नाही तर ठाणे, नाशिक, पुण्यातूनही मनसेचे कार्यकर्तेही मुंबईत मोर्चासाठी धडकणार आहेत.Image result for pravin darekar

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मनसेच्या मोर्चाला भाजपचा पाठिंबा असल्याची माहिती नेते प्रवीण दरेकर यांनी दिली. ते म्हणाले, ''हा कुठल्याही पक्षाचा विषय नाही. हा विषय देशातील घुसखोरांना बाहेर काढण्याचा आहे. हा मुद्दा राष्ट्रप्रेमाचा आहे. त्यामुळे या मोर्चाकडे राष्ट्रप्रेमातूनच पाहावे त्यामुळे ज्यांना मोर्चामध्ये सहभागी व्हावे, असे वाटते त्यांनी सहभागी व्हावे.'' दरेकर हे पुर्वाश्रमीचे मनसे सैनिक होत. ते मनसेचे आमदार देखील राहिले आहेत. 

मोठी बातमी -  अरेरे ! गोव्यात खास 'त्या'साठी जाणाऱ्यांसाठी अत्यंत वाईट बातमी..


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP's support for the maharashtra navnirman sena mumbai morcha