esakal | मनसेत इनकमिंग... 'या' नेत्यांनी केला 'मनसे'प्रवेश
sakal

बोलून बातमी शोधा

मनसेत इनकमिंग... 'या' नेत्यांनी केला 'मनसे'प्रवेश

मनसेत इनकमिंग... 'या' नेत्यांनी केला 'मनसे'प्रवेश

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महामेळाव्याआधी कृष्णकुंजवर हजेरी लावणारे हर्षवर्धन जाधव म्हणजेच रावसाहेब दानवे यांचे जावई आणि पंकजा मुंडे यांचे मामा प्रकाश महाजन यांनी मनसेचा झेंडा पुन्हा हाती घेतलाय. हे दोघे नेते या आधी मनसेत होते. अशात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपला ट्रॅक बदलून हिंदुत्वाचा अजेंडा प्रखरपणे राबविल्याने या दोन्ही नेत्यांची घरवापसी झालीये. याचसोबत  शिवसेनेचे लोकसभा सहसंपर्क प्रमुख सुहास दशरथे आणि शिवसेनेचे नांदेडचे माजी जिल्हाप्रमुख प्रकाश कौडगे यांनीही मनसेत प्रवेश केला आहे. 

मोठी बातमी - अंटार्टिकामध्ये आतापर्यंतच्या सर्वात जास्त तापमानाची नोंद..

हर्षवर्धन जाधव हे भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत. हरषवर्धन जाधव हे अनेकदा वादात सापडलेत. त्यांच्यावर पत्नीला मारहाण करण्याचे आरोप करण्यात आलेत, याचसोबत रावसाहेब दानवे यांच्यावर हर्षवर्धन पाटील यांनी घर फोडल्याचा आरोप केला होता.  हर्षवर्धन जाधव यांनी सुरवातीला या मनसेच्या तिकिटावर निवडणूक लढवली. ते आमदार देखील झाले. मात्र यानंतर त्यांनी मनसेला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला. दरम्यान काही काळात त्यांनी शिवसेनेला देखील सोडचिठ्ठी दिली. 

मोठी बातमी - मुंबई भाजप अध्यक्षपदासाठी 'यांची' नावं आहेत चर्चेत

प्रमोद महाजन आणि प्रवीण महाजन यांचे थोरले बंधू म्हणजे प्रकाश महाजन. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सुरवातीच्या काळात प्रकाश महाजन हे मनसेत होते. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राजकारण करतेय. हाच मुद्दा भावल्याचं त्यांनी माध्यमांना सांगितलंय. २००९ मध्ये पप्रकाश महाजन यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला रामराम ठोकला होता.  

मोठी बातमी - अरेरे ! गोव्यात खास 'त्या'साठी जाणाऱ्यांसाठी अत्यंत वाईट बातमी..

सुहास धाशरथे यांनी देखील मनसेत प्रवेश केलाय. दशरथे हे शिवसेनेचे लोकसभा सहसंपर्क प्रमुख म्हणून कार्यरत होते. दशरथे हे चंद्रकांत खैरे यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात  

prakash jawdekar and harshwardhan patil joins MNS suhas dashrathe join hands with mns