esakal | वाहने उभी करण्यावरून दोन गटांत हाणामारी 
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

वाशीनाका येथे सहा जण जखमी; दोन्ही गटांतील 15 जणांना अटक 

वाहने उभी करण्यावरून दोन गटांत हाणामारी 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : चेंबूर येथील वाशीनाका परिसरातील मुकुंदनगर परिसरात वाहने उभी करण्यावरून शुक्रवारी रात्री उशिरा दोन गटांत वाद होऊन त्याचे पर्यवसान दगडफेक व नंतर हाणामारीत झाले. यात 6 ते 7 जण जखमी झाले असून त्यांना विविध रुग्णालयांत उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दगडफेकीत अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. 

नवी मुंबईत महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजप असं करतंय प्लॅनिंग

मुंबईतील विविध प्रकल्पबाधित रहिवाशांचे एमएमआरडीए व पालिकेतर्फे वाशीनाका परिसरातील माहुल गाव, गडकरी खाण, एचपी कॉलनी या ठिकाणी उभारलेल्या इमारतींमध्ये पुनर्वसन करण्यात येत आहे; तर मुकुंदनगरमधील जुन्या व नव्या इमारतींमध्येही प्रकल्पबाधित रहिवाशांचे पुनर्वसन केले आहे. जुन्या इमारतींमधील रहिवासी आपली वाहने समोरील मैदानात उभी करतात.

आगीच्या घटना टाळण्यासाठी उद्योगांनी प्रशिक्षित कर्मचारी नेमावे

नव्या इमारतीमधील रहिवाशांची तरुण मुले याच मैदानात क्रिकेट खेळत असताना त्यांच्याकडून काही वाहनांच्या काचा फुटल्याने वादाला सुरुवात झाली. त्याचे रूपांतर रात्री 10 ते 11 च्या सुमारास हाणामारी व दगडफेकीत झाले. त्यानंतर मैदानात व रस्त्यावर उभ्या वाहनांची तोडफोड करण्यात आली. वाहने उभी करणे तसेच क्रिकेट खेळण्यामुळे वाहनांचे होणारे नुकसान यांमुळे या दोन गटांत काही दिवसांपासून वाद सुरू होता. त्यावरूनच शुक्रवारी दोन गटांत हाणामारी व दगडफेक झाली.

कोरोना रुग्णांमध्ये अडकलेल्या तिची मदतीची हाक

समाजमाध्यमांच्या साह्याने तपास 
दरम्यान, या हाणामारीमागील नेमके कारण कोणते, याचा पोलिस तपास करीत आहे. या दगडफेक व हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. पोलिसांनी या व्हिडीओ आणि फोटोच्या माध्यमातून आरोपींचा शोध सुरू केला आहे. आरसीएफ पोलिसांनी हाणामारी व दगडफेकीत सहभाग असलेल्या 10 ते 15 आरोपींना ताब्यात घेतले असून अन्य आरोपींचा शोध घेत आहे. संभाव्य माहिती आणि व्हिडीओच्या मदतीने पोलिसांचा तपास सुरू आहे. 

loading image
go to top