Dasara Melava: "होय मी कंत्राटी मुख्यमंत्री..."; CM शिंदेंनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर

बीकेसीत एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा पार पडला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला.
eknath Shinde
eknath Shinde

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कंत्राटी मुख्यमंत्री म्हणून हिणवणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शिंदे यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. बीकेसीतील मैदानात शिवसेनेच्या शिंदे गटाच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीकाही केली. (BKC Dasara Melava I am contract Chief Minister Shinde gave bitter reply to Uddhav Thackeray)

eknath Shinde
Dasara Melava: तेजस ठाकरेंची दिसली जादू! तरुणाईला आवरला नाही सेल्फीचा मोह

CM शिंदे म्हणाले, तुम्ही म्हणताय की हा मुख्यमंत्री कंत्राीटी आहे. पण मी सांगतो होय मी कंत्राटी आहे. मी जनतेची सेवा करण्याचं, राज्याला सुजलाम सुफलाम करण्याचं कंत्राट घेतलंय. म्हणून या राज्याचं कंत्राट योग्य कंत्राटदाराच्या हाती गेलंय. ज्या लोकांनी सेना संपवण्यासाठी काय काय केलं? हे तुम्हाला सांगायची गरज नाही. बाळासाहेबांनी हे आधीच ओळखलं होतं.

eknath Shinde
Dasara Melava: 'गाई'चं हिंदुत्व बस्स झालं आता 'महागाई'वर बोला; उद्धव ठाकरेंचा भाजपवर टोला

काँग्रेसच्या भ्रष्टाचारामुळं देशाचं वाटोळं झालं आणि त्यांच्याच दावणीला तुम्ही सेना बांधली. ज्यांनी बाळासाहेबांना अटक केली त्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसता. तुम्ही म्हणालं की, तुम्हीपण सोबत होता पण हो, आम्ही पण होतो पण सत्ता तुमच्याकडे होती. एकनाथ शिंदे हा देणारा आहे, घेणारा नाही. म्हणून तुम्ही माझ्यामागे उभे होतात. बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या लोकांना तुम्ही सरकारमध्ये घेणार नाही, अशी अट का घातली नाही? हेच तर आमचं दुर्दैव आहे.

eknath Shinde
Dasara Melava : "...तर बीकेसीवर कचरा मेळावा सुरुए"; भास्कर जाधवांकडून शिंदे गटावर निशाणा

सावरकर हे आमचं दैवत आहे, पण काँग्रेसचा विरोध म्हणून त्यांचं नाव आम्ही का घ्यायचं नाही? माफीवीर म्हणून तुम्ही सावरकरांचा करायचा आणि आम्ही गप्प बसायचं. एक वेळ मी माझं दुकान बंद करेल पण काँग्रेससोबत जाणार नाही, असं सांगणाऱ्या बाळासाहेबांच्या विचारांना तुम्ही तिलांजली दिली. किती लाचारी करावी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com