BKC MVA Rally: गद्दारी झाल्यानंतर सोनिया गांधींनी पहिला फोन उद्धव ठाकरेंना केला अन्...; भाई जगतापांनी केला खुलासा

ज्यावेळी शिवरायांच्या महाराष्ट्राला गिळंकृत करण्याचं पाप आत्ताच्या असंविधानिक सरकारनं केला.
Bhai Jagtap
Bhai Jagtap

मुंबई : महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा १ मे रोजी बीकेसीतील मैदानात पार पडली. यावेळी आघाडीतील नेत्यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका केली. यावेळी राज्यात शिवसेनेत फूट पडल्यानंतर काँग्रेसच्या हायकमांड सोनिया गांधी यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला. याबाबतचा खुलासा मुंबई काँग्रेसचे प्रमुख भाई जगताप यांनी केला. (BKC MVA Rally Sonia Gandhi made first call to Uddhav Thackeray Bhai Jagtap disclosed truth)

Bhai Jagtap
WhatsAppनं बंद केले ५० लाख अकाउंट्स!; सुरक्षा अहवालातून कारण आलं समोर

भाई जगताप म्हणाले, "ज्यावेळी छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राला गिळंकृत करण्याचं पाप आत्ताच्या असंविधानिक सरकारनं केलं. अशा वेळेस आमच्या नेत्या सोनिया गांधी, राज्यातील नेत्यांनी निर्णय घेतला, राष्ट्रवादीच्या पवारांनी निर्णय घेतला. आम्हाला एकत्र येणं गरजेचं आहे आणि या राक्षसाविरोधात लढणं गरजेचं आहे. ही काळाची गरज आहे असं त्यांनी म्हटलं.

Bhai Jagtap
Barsu Refineray: उद्योगमंत्री सामंत अन् शरद पवार भेट; 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा, जाणून घ्या

ही तुटकी फुटकी महाविकास आघाडी नाही. कारण ज्यावेळी महाराष्ट्रात गद्दारी झाली तेव्हा सर्वात आधी पहिला फोन सोनिया गांधींनी उद्धव ठाकरेंना फोन केला आणि सांगितलं की, "जे काही होईल ते होऊ द्या काँग्रेस तुमच्यासोबत आहे, कायम तुमच्या सोबत आहोत" हा विश्वास सोनिया गांधींनी दिला, असं यावेळी भाई जगताप यांनी सांगितलं.

Bhai Jagtap
WhatsAppनं बंद केले ५० लाख अकाउंट्स!; सुरक्षा अहवालातून कारण आलं समोर

कदाचित उद्धव ठाकरेंना आणि आमच्या सर्व नेत्यांना आता ही गोष्ट खरी वाटेल ज्यांच्यासोबत पंचवीस वर्षे सोयरिक केली त्यांनी खंजीर खुपसलं पाठीत. यांचा इतिहास हाच आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीचा हा इतिहास नाही. बोक्याचं लक्ष्य शिक्यावर अशी सध्याची राजकीय स्थिती आहे. महापालिकेच्या ९० हजार कोटींच्या ठेवींवर यांचं लक्ष आहे, पंतप्रधानांनीही आपल्या भाषणात याचा उल्लेख केला होता, असा आरोपही यावेळी भाई जगताप यांनी केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com