Black Carbon Found in Monsoon Cloud
esakal
राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू असतानाच पावसाच्या स्वरूपाबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. भारतीय उष्णदेशीय हवामानशास्त्र संस्थेच्या (IITM) शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनात नैर्ऋत्य मोसमी पावसाच्या ढगांमध्ये ब्लॅक कार्बन (काजळीचे सूक्ष्म कण) आढळल्याचे समोर आले आहे. या कणांचे प्रमाण भविष्यात वाढत राहिल्यास ढगांची निर्मिती आणि पावसाची प्रक्रिया प्रभावित होऊ शकते, असा निष्कर्ष संशोधकांनी मांडला आहे.