भाजप कार्यकर्त्यांनी निरुपमला दाखविले काळे झेंडे 

गजानन चव्हाण
शनिवार, 7 जुलै 2018

खारघर : मुंबई प्रदेश कांग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून काळे झेंडे दाखविले. खारघर मध्ये सिडकोने सेंट्रल पार्कसाठी राखीव ठेवलेला भूखंड जिल्हा अधिकाऱ्याने  कोयना प्रकल्प ग्रस्त शेतकऱ्यांना दिला . त्यानंतर त्यांचाकडून बिल्डरांनी अल्प दरात खरेदी करून शेतकरी तसेच शासनाची फसवणूक केल्याचे प्रकरण कांग्रेस पक्षाने बाहेर काढले. 

हा भूखंड घोटाळा उघडकीस आल्याने निरुपम हे आज (ता. 7) दुपारी खारघर मध्ये पत्रकारासाठी सवांद साधण्यासाठी आणि सदर भूखंडाची पाहणी करण्यासाठी थ्री स्टार या ठिकाणी आले. तशी माहिती मिळताच खारघर मधील भाजप नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून निरुपम यांच्या विरोधात घोषणा दिल्या. दरम्यान वेळीच मोठ्या प्रमाणात पोलीस आल्याने कार्यकर्त्यांनी पळ काढला.
 
Web Title: Black flag shown by BJP activists to Nirupam