
मुंबई - कोविड रुग्णांसाठी प्रभावी ठरणारे रेमडेसीवर या इंजेक्शनचा बाजारात मोठ्या प्रमाणात काळा बाजार सुरु आहे. गंभीर कोविड रुग्णांसाठी रेमडेसीवर इंजेक्शनचे प्रिस्क्रिपशन रुग्णालयातून दिले जाते. मात्र, बाजारात रेमडेसीवरची मागणी वाढल्याने काळा बाजार ही सुरू होऊन अव्वाच्या सव्वा किंमतीने या इंजेक्शनची विक्री केली जात आहे. मुळ किंमतीच्या 10 पट अधिक दराने या इंजेक्शनची विक्री केली जात आहे.
सध्या बाजारात रेमडेसीवर 40 ते 50 हजार रुपये किंमतीने विकले जात आहे. हा तुटवडा कमी व्हावा आणि लोकांना हे इंजेक्शन उपलब्ध व्हावं म्हणून राज्य सरकारने सरकारी आणि पालिका रुग्णालयांमध्ये मागवले आहेत. दरम्यान, पालिकेने 15000 इंजेक्शनची मागणी केली असून 5,900 इंजेक्शन त्यांना देण्यात आली आहेत. रेमडेसीवर हे इंजेक्शन बांग्लादेशातील एका कंपनीकडून भारतात मागवण्यात येत आहे. मुंबईतून बांग्लादेश आणि भारतातील काही कंपन्यांना दिवसाला 50 प्रिस्क्रिपशन दिले जात आहेत.
दरम्यान, डीसीजीआय म्हणजेच ड्रग नियंत्रण जनरल ऑफ इंडियानुसार, फार्मास्युटीकल कंपनी फक्त रुग्णालयांना रेमडेसीवरची विक्री करु शकतात. मात्र, फार्मासिस्ट हे इंजेक्शन बाजारात जास्तीच्या दराने जवळपास 30 ते 40 हजार रुपये किंमतीने विकत आहेत.
तर, या काळ्या बाजाराला काही फार्मासिस्ट कंपन्यानीही विरोध केला आहे. महाराष्ट्र रजिस्टर फार्मासिस्ट असोसिएशन’चे अध्यक्ष कैलाश तांदळे म्हणाले की, रेमडेसीवर इंजेक्शन 5 हजारचे 50 हजार रुपयांना विकले जात आहे. काही लोक फक्त काळा बाजार करण्यासाठीच मागवतात. दोन महिन्यांपूर्वी बांग्लादेशने जसे उत्पादन सुरू केले होते तसेच जर आपण सुरू केले असते तर ही वेळ आली नसती. आजपासून बर्याच ठिकाणी उपलब्ध होईल. आणखी चार पाच दिवसांनी सुरळीत पुरवठा होईल. पण, ज्यांनी काळा बाजार केला त्यांच्यावर सरकारने कारवाई केली पाहिजे.
अडीच दिवसांपासून शोधत होतो. बर्याच मेडिकलमध्ये संपर्क केला होता. त्या प्रत्येकाने रेमडेसीवर उपलब्ध नाही असं सांगितलं. त्यानंतर, 30 ते 40 हजार किंमतीने हे इंजेक्शन उपलब्ध झालं होतं. पण, काल दुपारी 5, 400 रुपयांना हे इंजेक्शन उपलब्ध झालं आहे.
प्रज्ञा पिसाळ, रुग्णांच्या नातेवाईक
.......
जर कोणीही जास्त पैसे घेऊन रेमडेसीवरचा पुरवठा करत असेल तर याबाबत एफडीएला याबाबतची माहिती द्यावी. या इंजेक्शनची फक्त एक तुकडी आत्तापर्यंत पोहचली आहे. ती पुरवठा प्रक्रियेत आहेत. 5 दिवसांच्या आत ही परिस्थिती सामान्य होईल. आधी फक्त हेटेरो या कंपनीने साठा पुरवला होता. मात्र, काल सिप्लाने ही पुरवठा केला आहे. रुग्णालयातील डॉक्टर्स आता रेमडेसीवर लिहून देतात पण, तेवढा साठाच उपलब्ध नव्हता. मात्र, ही परिस्थिती आता काही दिवसांत सुधारेल. 5400 रुपयांना हे इंजेक्शन उपलब्ध होणार आहे. आतापर्यंत किती जणांना याचा पुरवठा झाला याची माहिती ही एफडीएला देण्यात आली आहे.
शरद नांदेकर, औषध निरीक्षक, एफडीए
दरम्यान, सिप्ला कंपनीने बुधवारी सिप्रेमी नावाची रेमडेसीवरची पहिली बॅच दिली आहे. एका महिन्यात 80,000 इंजेक्शनचा पुरवठा सिप्लाकडून करण्यात येणार आहे असं ही सांगण्यात आले आहे.
रेमडेसीवरचा कसा होतोय काळा बाजार?
खासगी रुग्णालयातून काळा बाजार समोर येत आहे. तीन प्रकारचे कोरोना रुग्ण आहेत. सौम्य, मध्यम आणि तीव्र अशी लक्षणे सध्या रुग्णांमध्ये दिसत आहेत. खासगी रुग्णालयातील डॉक्टर्स सौम्य लक्षणं असणार्या रुग्णांनाही रेमडेसवीर आणायला सांगितले जात आहे. नातेवाईक अनेक मेडिकल स्टोअर्समध्ये फिरतात. आणि कुठूनही ते घेऊन येतात. त्यामुळे, ज्यांची लक्षणे सौम्य आहेत अशाच रुग्णांना हे इंजेक्शन मिळतं. पण, ज्यांना खरंच गरज आहे अशा रुग्णांना मिळणं कठीण होतं. सौम्य लक्षणांच्या आधारावर मागवलेले इंजेक्शन रुग्णालयात स्टाॅकमध्ये ठेवतात. आणि ज्या वेळेस एखाद्या गंभीर रुग्णांना इंजेक्शनची गरज असेल त्यावेळेस त्यांना ते वाढीव किंमतीने दिले जाते. शिवाय, फक्त प्रिस्क्रिपशन दिल्यामुळे इंजेक्शन दिले जाते. पण, खरंच त्या रुग्णाला इंजेक्शनची गरज आहे का याची तपासणी केली जात नाही. लक्षणे नसलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना ही रेमडेसीवर सांगितले जाते. त्यामुळे, या सर्व परिस्थितीवर एफडीएने लक्ष देणे गरजेचे आहे. इंजेक्शन किती दिले? आणि कोणाला दिले, खरंच गरज होती का द्यायची? याची ही तपासणी केली पाहिजे. असाच काळा बाजार होत आहे. अशी माहिती ऑल फूड ड्रग्ज अॅण्ड लायसंस होल्डर फाउंडेशनचे अध्यक्ष अभय पांडे,यांनी दिली.
------------------------------
(संपादन - तुषार सोनवणे)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.