पालघरमध्ये टोसिलीझुमॅब औषधाचा काळाबाजार उघडकीस; उपचाराच्या नावाखाली रुग्णांची पिळवणूक

तुषार सोनवणे
Tuesday, 1 September 2020

कोरोना काळामध्ये आरोग्याच्या या बिकट समस्येमध्येही काही लोक नागरिकांच्या नाईलाजाचा गैरफायदा घेत असल्याचे दिसून आले आहे

पालघर - कोरोना काळामध्ये आरोग्याच्या या बिकट समस्येमध्येही काही लोक नागरिकांच्या नाईलाजाचा गैरफायदा घेत असल्याचे दिसून आले आहे. गंभीर समस्या असलेल्या कोरोना रुग्णांना रेमडेसिव्हीर तसेच टोसिलीझुमॅब या औषधाची गरज असते.परंतु या औषधांचा मोठा प्रमाणात काळा बाजार राज्यात सुरू असल्याचे अनेकदा समोर आले आहे, असाच काहीसा प्रकार पालघरमध्येही दिसून आला आहे. 

खासगी रूग्णालयांवरील सरकारचे नियंत्रण संपूष्टात? सरकारकडे मुदतवाढीचा प्रस्ताव रखडला

पालघरमधील बोईसर येथील शासकीय रुग्णालयात अत्यवस्थ रुग्णांना टोसिलीझुमॅब औषध विकत आणण्यासाटी तेथील डॉक्टरांकडून सक्ती करण्यात येत आहे. या औषधाचा बाजारात तुटवडा आहे हे खरे परंतु, तरीसुद्धा या औषधाची मागणी रुग्णांच्या नातेवाईकांकडून केली जाते. रुग्णांच्या नातेवाईकांकडून हे औषध उपलब्ध न झाल्यास डॉक्टर त्यांना अधिक किंमतीत औषध उपलब्ध करून देण्यात येईल असे सांगतात. आधिच आपल्या रुग्णाच्या प्रकृतीच्या चिेतेत असलेले नातेवाईक जेमतेम करून डॉक्टर म्हणतील ती रक्कम जमा करण्यास तयार होतात. या संबधित अनेक तक्रारी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडे आल्या आहेत. या औषधाचा वापर कोरोना रुग्णांसाठी उपयोगाचा नसल्याचे खुद औषध बनविनाऱ्या कंपनीने स्पष्ट केले आहे. तरीही या औषधासाठी रुग्णांच्या नातेवाईकांकडे तगादा लावला जात असल्याचे दिसून येत आहे. 

जे. जे. रुग्णालयात काळ्या फिती लावून परिचारिकांचं आंदोलन

संबधित रुग्णांच्या नातेवाईकांना 40 हजार रुपयांपर्यंत मिळणारे औषध कोणतीही पावती न देता 70 हजार रुपयांपर्यंत विकले जात असल्याची धक्कादायक माहिती सुत्रांकडून मिळत आहे. विशेष म्हणजे रुग्णालयातील डॉक्टरच या काळा बाजारात सामील ्असल्याचे बोलले जात आहे.असा पद्धतीने रुग्णांची त्यांच्या अडचणीच्यावेळी लूटमार होत असेल, तर सर्वसामान्य जणांचा आरोग्य यंत्रणेवरचा विश्वास कमी होऊ शकतो हे नक्की...

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Black market of Tosilizumab drug exposed in Palghar; Extortion of patients in the name of treatment