थंडीत गारठणाऱ्यांना ब्लॅंकेटचा आधार

mumbai.jpg
mumbai.jpg

उल्हासनगर : यंदा सर्वत्र कडाक्याची थंडी पडली असून चार भिंतीच्या आत राहणारे नागरिकही गारठत असल्याचे चित्र दिसत आहे. थंडी गारठणाऱ्या गोरगरिबांना जुने स्वेटर, कपडे, ब्लॅंकेट देण्याची हाक मासमीडियावर केली जात आहे. उल्हासनगरातील तरुणाई फुटपाथवर थंडीत गारठत झोपेत हुळहुळणाऱ्या गरिबांना ब्लॅंकेटचा आधार देण्यासाठी दररोज रात्री 12 वाजण्याच्या सुमारास घराच्या बाहेर पडत आहे. रात्रभर ब्लॅंकेटचा गठ्ठा मोटरसायकलवर घेऊन फिरणाऱ्या या तरूणाईवर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होऊ लागला आहे.

कल्याण-अंबिवली-टिटवाळा-उल्हासनगर भागात भीक मागून पोट भरणाऱ्या गोरगरिबांना राहण्यासाठी निवारा नसल्याने ते फुटपाथवरच संसार थाटून तिथेच झोपतात. यावेळेसच्या थंडीत एखादी जुनी चादर अंगावर घेऊन ते हुळहुळतच कशीबशी रात्र काढतात. पहाटे शेकोटी करून थंडीवर मात करण्याचा प्रयत्न करतात ते बघून आपण निवारा नाही पण, ब्लॅंकेटचा आधार देऊ शकतो, या लोकभावनेतून श्रीपाल मुथा, भरत भाटि, सचिन जैन, रोहन कोट, पप्पू भाटि, ही तरुणाई रात्री 12 वाजण्याच्या सुमारास मोटरसायकलवर ब्लॅंकेटचे गठ्ठे घेऊन बाहेर पडून थंडीत हुळहुळत पडणाऱ्या गोरगरिबांना ब्लॅंकेटचा आधार देत आहे. दुसरीकडे वालधुनी उल्हास बिरादरी टीमच्या अनुष्का शर्मा, मोनिका दुसेजा, राखी बरुड ह्या तरुणी देखील आदिवासी पाड्यातील महिलांना ब्लॅंकेटचे वाटप करत आहे.

आतापर्यंत या तरूणाईने 500 ब्लॅंकेटचा आधार गरिबांना दिला आहे.10 जानेवारी पर्यंत ही तरुणाई रोज रात्री बाहेर पडून गोरगरिबांना ब्लॅंकेटचा आधार देणार आहे. मागच्या वर्षी एक हात मदतीचा या संस्थेचे अध्यक्ष विजय कदम यांनी त्यांच्या टीम सोबत फुटपाथवरील गरिबांना ब्लॅंकेटचा आधार दिला होता.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com