esakal | मुंबई : 'रक्तमिच्टीस मुंबा' नव्या प्रजातीचा शोध | Tejas Thackeray
sakal

बोलून बातमी शोधा

blind ill fish

मुंबई : 'रक्तमिच्टीस मुंबा' नव्या प्रजातीचा शोध

sakal_logo
By
मिलिंद तांबे

मुंबई : मुंबई ब्लाइंड इल (Blind ill fish) म्हणजेच सर्पाच्या प्रकारातील एक अंध माश्याचा शोध मुंबईत लावण्यात आला आहे. या प्रजातीचे 'रक्तमिच्टीस मुंबा' असे नामकरण करण्यात आले आहे. तेजस ठाकरे (tejas Thackeray),प्रवीणराज जयसीम्हान आणि अनिल मोहोपात्रा यांच्या टीम ने हे संशोधन केले आहे. ठाकरे वाईल्ड लाईफ फाउंडेशनने पर आणि शेपूट नसलेल्या एका नव्या दुर्मिळ माश्याची प्रजाती शोधून काढली आहे.

हेही वाचा: मुंबई : ४८ वर्षांच्या वाहतूक पोलिसाला कारचालकाने फरफटत नेले; गुन्हा दाखल

2019 साली जोगेश्वरीतील एका अंध शाळेच्या विहिरीत मासा सापडला होता. त्याच्यावर साधारण 2 वर्षे त्याच्यावर संशोधन सुरू होते. विहिरीत पाणी पाझरण्याच्या जागी असलेल्या लाल मातीत हा मासा सापडतो. त्याला डोळे नसल्याने केवळ वासावरून तो भोवतालच्या वातावरणाचा अंदाज घेतो व छोटे किडे खातो. अशाप्रकारे अंध असणारा हा महाराष्ट्रातील गोड्या पाण्यातील पहिलाच मासा आहे.मुंबा ची त्वचा पारदर्शक असून त्याच्या शरीरातील लाल रक्तवाहिन्यांमुळे तो लालसर रंगाचा दिसतो.

हेही वाचा: मुंबई : निधी उपशामुळे म्हाडा कर्मचाऱ्यांचे पगार धोक्यात

महाराष्ट्र आणि उत्तर पश्चिम घाटातून वर्णन केलेली ही पहिली पूर्णपणे अंध भूगर्भातील गोड्या पाण्यातील माशांची प्रजाती आहे.'मुंबा' या प्रजातीचे नाव मुंबई शहराचे अस्तित्व सूचित करते. 'मुंबा' या शब्दाची मूळ मराठी भाषेतून आले असून या शहरातील रहिवाशांनी पूजलेली मुंबा आई या देवतेचा सन्मान करते. या शब्दाचा आदर म्हणून या नवीन प्रजातीचे नामकरण मुंबा असे करण्यात आले असल्याचे तेजस ठाकरे यांनी म्हटले आले.

रक्तामिथिसच्या इतर ज्ञात प्रजातींपासून 21.6 - 22.8% च्या अनुवांशिक अंतराने, भारतातील वर्णन केलेल्या वंशाची ही 5 वी प्रजाती आहे.यापूर्वी हायपोजेनिक आणि कॅव्हरनीकोलस प्रजाती आणि त्यांच्या अधिवास प्रणालींचा पुरेसा अभ्यास झाला नव्हता. त्यामुळे या प्रजातीचे संवर्धन धोरण तयार करण्यासाठी उपलब्ध डेटा पुरेसा नाही असे ही सांगण्यात आले.

loading image
go to top