esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

accident

मुंबई : ४८ वर्षांच्या वाहतूक पोलिसाला कारचालकाने फरफटत नेले; गुन्हा दाखल

sakal_logo
By
राजु परुळेकर - सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कर्तव्य बजाविणार्‍या वाहतूक विभागाच्या एका ४८ वर्षांच्या पोलीस नाईकला (traffic police) हुंडाई कारचालकाने (Hyundai car) अंधेरीतील आझादनगर ते डी. एन नगर दरम्यान बोनेटवर फरफटत (Accident) नेल्याची धक्कादायक घटना गुरुवारी घडली. पळून गेलेल्या कारचालकाविरुद्ध डी. एन नगर पोलिसांनी (DN nagar police) सरकारी कामात अडथळा आणणे तसेच अन्य भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला (FIR) आहे.

हेही वाचा: रिया चक्रवर्तीने नाकारली 'बिग बॉस'ची ऑफर; मिळणार होते इतके लाख रुपये

त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. दरम्यानग गुन्ह्यांतील हुंडाई कार सायंकाळी उशिरा पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. ही घटना गुरुवारी सकाळी अकरा ते साडेअकरा वाजता अंधेरीतील आझादनगर ते डी. एन नगर वसाहतीत घडली. मेघवाडी पोलीस वसाहतीत राहणारे विजयसिंह कृष्णराव गुरव हे वाहतूक विभागात कार्यरत असून सध्या त्यांची पोस्टिंग डी. एन नगर पोलीस चौकीत आहेत. गुरुवारी त्यांची दिवसपाळी असल्याने ते सकाळी पोलीस चौकीत हजर झाले होते. त्यानंतर ते सकाळी आझादनगर येथे कर्तव्य बजावित होते. यावेळी एक कारचालक वाहतुक पोलिसांनी दिलेल्या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन करुन कार विरुद्ध दिशेने घेऊन येताना त्यांना दिसला.

हेही वाचा: शिक्षक-शिक्षकेतरांच्या प्रवासाचा प्रश्न सोडवा; मुख्यमंत्र्यांना पत्र

त्यामुळे कारचालकावर कारवाई करण्यासाठी ते पुढे गेले आणि त्यांनी कारचालकाला थांबण्याचा इशारा केला. मात्र वारंवार सांगूनही त्याने कारची काच खाली घेतली नाही. तो पळून जाण्याच्या तयारीत असल्याने विजयसिंह हे कारच्या समोरील बोनेटवर चढले. तरीही तो खाली येत नव्हता. काही कळण्यापूर्वीच तो त्यांना बोनेटवरच घेऊन आझादनगर येथून डी. एन नगर वसाहतीत घेऊन आला. तिथे काही लोकांनी ही कार अडविली. चालकाला कारबाहेर येण्यास सांगून तो परत आला नाही. त्यानंतर कार गणेश मंदिराजवळ नेऊन लोकांनी त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.

मात्र त्याने कार सुरु करुन इमारत क्रमांक चौदा, अभिनव सह्याद्री सहकारी सोसायटीसमोरुन रिव्हर्स घेऊन सुसाट वेगाने पळून गेला. तोपर्यंत अनेकांनी हा प्रकार मोबाईलवर व्हिडीओ बनविला होता. हा व्हिडीओ नंतर सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता. विजयसिंह यांच्याकडून ही माहिती मिळताच डी. एन नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी हुंडाई कारचालकाविरुद्ध ३५३, २७९, ३३६, १८४ भादवी आणि मोटार वाहतूक कायदा कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. या गुन्ह्यांतील कार सायंकाळी उशिरा पोलिसांनी जप्त केली. मात्र कारचालक पळून गेल्याचे दिसून आले. त्याच्या अटकेसाठी आता पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. लवकरच त्याला या गुन्ह्यांत अटक केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

loading image
go to top