ब्रेन ट्यूमरमुळे अंधत्व! 72 वर्षीय व्यक्तीचा पिट्यूटरी ट्यूमर काढण्यात डॉक्टरांना यश

ब्रेन ट्यूमरमुळे अंधत्व! 72 वर्षीय व्यक्तीचा पिट्यूटरी ट्यूमर काढण्यात डॉक्टरांना यश

मुंबई - ब्रेन ट्यूमरमुळे अंधत्व आलेल्या मुंबईतील 72 वर्षीय एका व्यक्तीच्या मेंदूवर जटील शस्त्रक्रिया करून नव्याने जीवदान मिळाले आहे. या व्यक्तीच्या पिट्यूटरी ग्रंथीमध्ये ट्यूमर असल्याचे निदान झाले होते. या ट्यूमरमध्ये व्यक्तीच्या दृष्टीवर परिणाम झाला होता. परंतु, अशा स्थितीत या रूग्णावर एन्डोस्कोपीद्वारे(दुर्भिणी) एंडोनसल सर्जरी करून पिट्यूटरी ग्रंथीमधील 4 सेंटिमीटरचा मोठा ट्यूमर काढण्यात मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट रूग्णालयातील डॉक्टरांना यश आले आहे.

धनसुखलाल देधीया असं या रूग्णाचे नाव असून मे 2020 मध्ये त्यांना प्रोस्टेट कॅन्सर असल्याचे निदान झाले होते. कॅन्सर असल्याचे कळल्यावर त्यांना तातडीने केमोथेरपी सुरू करण्यात आली होती. पण काही महिन्यांनी त्यांच्या दृष्टीवर परिणाम झाल्याने त्यांना दिसणं बंद झालं होतं. दैनंदिन कामासाठीही त्यांना कुटुंबियांवर अवलंबून रहावं लागत होतं. काही कालावधीनं प्रकृती खालावल्याने त्यांना वोक्हार्ट रूग्णालयात दाखल करण्यात आले.

न्यूरोसर्जन डॉ. माजदा तुरेल म्हणाले की, ‘‘8 सप्टेंबर रोजी रूग्ण उपचारासाठी आला असता त्यांना अंधत्व आलं होतं. हळुहळु जवळच दिसणंही बंद झालं. वैद्यकीय चाचणी अहवालात या रूग्णांच्या पिट्यूटरी ग्रंथीमध्ये 4 सेंटिमीटरचा ट्यूमर असल्याचे निदान झालं. हा कॅन्सर ट्यूमर असल्याने कर्करोगतज्ज्ञांच्या मदतीने उपचार करून कॅन्सर नियंत्रणात आणला. त्यानंतर डोळ्याची दृष्टी परत आणण्यासाठी शस्त्रक्रिया करणं गरजेचं होतं. त्यानुसार एन्डोस्कोपी एंडोनसल सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. ही शस्त्रक्रिया करण्यापूर्वी रूग्णाची कोविड-19 चाचणी करण्यात आली. ही चाचणी निगेटिव्ह आल्यानं 9 सप्टेंबर रोजी ही शस्त्रक्रिया करून ट्यूमर काढण्यात आला आहे.

काय आहे एंडोस्कोपिक एंडोनसल शस्त्रक्रिया ? 

तज्त्र डॉक्टरांनुसार, ‘‘एंडोस्कोपिक एंडोनसल शस्त्रक्रिया ही मेंदूला कुठल्याही प्रकारचा छेद न करता केली जाते. यात एन्डोस्कोपि एका नाकपुडीत घातली जाते. ब्रेन ट्यूमर काढण्यासाठी ही नवीन उपचारपद्धत आहे. नाक आणि साइनसद्वारे करण्यात येणाऱ्या या शस्त्रक्रियेत डॉक्टर डोक्याला छेद न करता मेंदूपर्यंत पोहचतात. या शस्त्रक्रियेद्वारे मेंदूतील ट्यूमर काढणं सहज सोपं होतं.

कोविडच्या काळात ही शस्त्रक्रिया विशेषतः आव्हानात्मक होती. कारण ही नाकाद्वारे शस्त्रक्रिया करताना रूग्णाला संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे सर्व बाबींची काळजी घेऊन ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली.

रूग्ण धनसुखलाल देधीया म्हणाले की, “मला डोळ्यांनी दिसणं बंद होऊ लागल्याने मी खूपच अस्वस्थ झालो होतो. मला समोर कोण उभंं आहे हे ओळखणंही अशक्य झालं. दिवसेंदिवस डोळ्यांची समस्या अधिकच वाढू लागली. परंतु, वोक्हार्ट रूग्णालयातील डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे मला पुन्हा दृष्टी मिळाली.

Blindness due to brain tumor Doctors succeed in removing pituitary tumor from 72 year old man

-----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com