जखमी प्रवाशांचा जीव वाचवण्यासाठी रक्तदान

दिनेश गोगी
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

उल्हासनगर : रेल्वेच्या अपघातात जखमी होणाऱ्या प्रवाशांना तातडीने रक्त उपलंब्ध व्हावे, त्यांचा जीव वाचवण्यासाठी रक्त कामी यावे या सकारात्मक उद्देशाने आज शिवसेनेने उल्हासनगर रेल्वे स्थानकावर रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. यावेळी 100 पेक्षा जास्त रक्ताच्या बाटल्याएवढे रक्तदान करण्यात आल्याची माहिती शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दिली.

कधी दारातून पडून, रूळ ओलांडताना आदी अपघातात प्रवासी जख्मी होतात. पण रक्ता अभावी ते मृत्युमुखी पडत असल्याने अशा प्रवाशांसाठी रक्त उपलब्ध होण्यासाठी शिवसेना शहर शाखेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन उल्हासनगर रेल्वे स्थानक प्लॅटफॉर्म नंबर 1 वर आयोजित करण्यात आले होते.

उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, विरोधी पक्षनेते धनंजय बोडारे, ग्राहक संरक्षण कक्ष शहरप्रमुख जयकुमार केणी, महिला आघाडी संघटक मनीषा भानुशाली, उपशहरप्रमुख राजेंद्र साहू यांच्या उपस्थितीत विभाग प्रमुख सुरेश सोनवणे, युवासेना अधिकारी बाळा श्रीखंडे, शाखा प्रमुख सुनील(कलवा) सिंग, विनोद हिंगे, आदिनाथ पालवे, राजेश कणसे, राजेश तरे, रोहन निकाळजे, संतोष चौधरी, बंसी, शाखाप्रमुख कलवा यांची पत्नी किरण सिंग, मधु अनिल जाधवानी आदींनी रक्तदान केले. शासकीय मध्यवर्ती रुग्णालयातील डॉक्टर, नर्स यांच्या देखरेखीखाली रक्तदानाची प्रकिया पार पडली.

यावेळी पदाधिकारी भरत खरे, शिवाजी जावळे, राजू माने, दीपक साळवे, अनिल मराठे, सुनील सानप, प्राध्यापक प्रकाश माळी, राजू पाटील, राजू शिंदे, संजय ससाणे,सागर उटवाल, स्मिता चिखलकर,प्रतिभा कालेकर,सुनिता तोडकर, मनीषा राजपूत,चारुशीला विश्वकर्मा आदी यावेळी हजर होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Blood donation to save lives of injured passengers