मुंबई - आता कोरोनाचे गंभीर रुग्ण रुग्णालयांमध्ये परतु लागले आहेत. लॉकडाऊनमध्ये टप्प्याने शिथिलता येत आहे. दरम्यान, मुंबईतील 11 रुग्णालयीन रक्तपेढ्यांमधील रक्तघटकांचा साठा अवघा 354 वर आला आहे. रक्तपेढ्यांमधील रक्तसाठा आटत असल्याने राज्य रक्त संक्रमण परिषदेने रक्तदानासाठी पुन्हा एकदा रक्तदानाची हाक दिली आहे. कोरोना काळ रक्त पुरवठ्यासाठी आव्हानात्मक ठरला असून आता रक्ताची गरज निर्माण झाली आहे. गरजे पुरता रक्तसाठा असला तरी आयत्यावेळी धावाधाव नको म्हणून रक्तदान शिबिरांसाठी रक्तपेढ्यांना आवाहन करण्यात आले आहे.
14 एप्रिल पूर्वी रक्तदानाचे आवाहन केल्याप्रमाणे सर्व रक्तदात्यांनी रक्तदानही केले. मात्र, या रक्ताची मुदत संपत आली असून कोणतीही रक्तपेढी शून्य रक्तपुरवठ्यावर चालू शकत नाही. रक्ताची तजवीज पुन्हा करावी लागणार आहे. त्यामुळे, राज्यात पुन्हा एकदा रक्तदान शिबिरांची तयारी करावी लागणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयांमधील महत्वाच्या शस्त्रक्रिया रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र थॅलेसेमिया, सिकल सेल, अॅनेमिया, हेमोफेलिया या रुग्णांसह प्रसुती आणि अत्यंत महत्वाच्या शस्त्रक्रियांना रक्ताची सतत निकड असते. या घटकांना कायम रक्त पुरवठा हवा असल्याने रक्त शिबिरे भरवावी लागणार आहेत.
यावर बोलताना राज्य रक्त संक्रमण परिषदेचे सहाय्यक संचालक डॉ. अरुण थोरात यांनी सांगितले की, आजच्या दिवशी गरजे एवढा रक्तसाठा आहे. मात्र कोरोनामुळे रक्त दान शिबिरे यावेळी झाली नाहीत. मात्र त्याचवेळी तुलनेने रक्त गरजही कमी झाली आहे. सध्या अपघात शून्यावर आले आहेत. शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या आहेत. कोरोनाचे नियम पाळून संस्थांना रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
डॉ. अरुण थोरात (सहाय्यक संचालक, राज्य रक्त संक्रमण परिषद) यांच्या माहितीनुसार 'भविष्यात रक्ताची चणचण भासू नये यासाठी नामांकित सामाजिक संस्थांना शिबिरांचे आवाहन करण्यात आले आहे. रक्तदान शिबिरेही गरज असेल एवढीच भरवण्यात यावीत. रक्त घेऊन वाया जाणार नाही याकडे ही लक्ष दिले जात आहे. कोणत्याही रक्तपेढीने थॅलेसेमिया रुग्णाला टाळू नये असे कडक आदेश देण्यात
आहेत'
रक्तपेढी रक्तघटक साठा
blood in mumbais blood bank is getting over only blood bank association ask for blood donation
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.