असाही पसरतोय कोरोना, समोर आले नवे निष्कर्ष, वाचा महत्त्वाची बातमी...

असाही पसरतोय कोरोना, समोर आले नवे निष्कर्ष, वाचा महत्त्वाची बातमी...

मुंबई , ता. 14 : कोविड 19 विषाणू बाबत नवनवी माहिती समोर येत आहे. कोविड चा विषाणू हवेतून पसरण्याची शक्यता असल्याचे समोर आले आहे. कोविड 19 बाधित रुग्णाने संभाषण केले असता त्याच्या तोंडातून निघालेल्या थुंकीच्या बिंदुकांतून कोविडचा विषाणू हवेत पसरत असल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ आणि युनिव्हर्सिटी ऑफ पेन्सिलविनिया ने केलेल्या संशोधनानुसार जेंव्हा एखादी व्यक्ती एक मिनिटांसाठी मोठ्याने बोलतो तेव्हा त्याच्या आसपासच्या परिघात 1 हजार कोविड विषाणूंचा समावेश असणारे थुंकीचे बिंदूके हवेत पसरतात. 'पीएएनएस जर्नल'ने मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या रिपोर्ट नुसार तोंडावाटे बाहेर पडलेले थुंकीचे बिंदुके हे 8 मिनिटे हवेत राहू शकतात. 

या दरम्यान एखादा निरोगी व्यक्ती त्याच्या संपर्कात आला तर त्याला देखील बाधा होण्याचा धोका संभवतो. त्यासाठी अभ्यासकांनी एका व्यक्तीला बंदिस्त जागेत "स्टे हेल्थी" यांसारखे शब्द मोठ्याने बोलायला लावले.  त्यानंतर त्यांनी नोंदवलेल्या निरीक्षणातून हा अहवाल तयार करण्यात आला आहे.

"स्टे हेल्थी" हा शब्द बोलायला लावण्यामागे ही शास्त्रीय कारणे आहेत. यातील 'स्टे' आणि 'हेल्थी' हे शब्द उच्चारल्याने थुंकीचे बिंदूके अधिक प्रमाणात बाहेर फेकले जातात. त्यानंतर संशोधकांनी लेजरद्वारे तोंडातून निघालेल्या थुंकीच्या बिंदुकांचे झालेल्या वेगवेगळ्या परिणामांची निरीक्षणे नोंदवली. 

त्यातून तोंडातून निघालेली बिंदूके वेगाने बाहेर पडून हवेत पसरतात आणि काही काळ तरंगत असल्याचे समोर आले आहे. संशोधकांच्या अभ्यासातून समोर आलेल्या निष्कर्षानुसार एखाद्या व्यक्तीच्या तोंडावाटे निघालेल्या थुंकीच्या बिंदुकांतून विषाणू हवेत पसरतो, आणि त्याच्या सान्निध्यात येणाऱ्या व्यक्तीला कोविड 19 ची बाधा देखील होऊ शकते हे अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. 

corona can travel through air and spread of corona is happening through air read full news 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com