मोठी बातमी - कोरोना विरुद्धची लढाई लवकरच संपणार, मात्र 'अशी' येऊ शकते कोरोनाची दुसरी लाट

मोठी बातमी - कोरोना विरुद्धची लढाई लवकरच संपणार, मात्र 'अशी' येऊ शकते कोरोनाची दुसरी लाट

मुंबई - मुंबई युनिव्हर्सिटीच्या स्कुल ऑफ इकॉनॉमिक्सच्या माध्यमातून कोरोना संदर्भात  आणखीन एक आता समोर येतोय. या रिसर्च रिपोर्टच्या माध्यमातून मुंबईतील कोविड रुग्णाच्या संख्येबाबत पुन्हा अनुमान करण्यात आलंय. ३ जूनपर्यंत मुंबईतील कोरोना रुग्णांची आकडेवारी ३५ हजारांवर जाऊ शकते अत्यंत वाईट परिस्थिती ओढवल्यास मुंबईतील रुग्णसंख्या ४० हजारांवर जाऊ शकते असं यामध्ये नमुद करण्यात आलंय. या आभ्यासात महामारीविज्ञान मॉडेलिंग (epidemiological modelling) याऐवजी लॉजिस्टीकचा तंत्राचा वापर करण्यात आलाय. या रिपोर्टच्या माध्यमातून महाराष्ट्रातील कोरोना रुग्णाच्या संख्येवर देखील भाष्य करण्यात आलंय. यामध्ये महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची आकडेवारी मे २१ पर्यंत ५० हजारांचा टप्पा गाठू शकते असं नमूद करण्यात आलंय.  

 ‘The Covid -19 Situation in Maharashtra: It is Definitely Getting Better’  'महाराष्ट्रातील कोविड परिस्थिती नक्कीच सुधारतेय' या मथळ्याखाली हा रिपोर्ट सबमिट करण्यात आलाय. मुंबई स्कुल ऑफ इकॉनॉमिक्समधील नीरज हातेकर आणि वांद्यातील श्रीमती MMK कॉलेजमधील कॉमर्स आणि इकॉनॉमिक्स या विभागातील पल्लवी बेल्हेकर यांनी हा रिसर्च रिपोर्ट बनवलाय. गेल्या काही महिन्यातील देशातील विविध राज्यांमधील कोविड १९ची परिस्थिती त्याचबरोबर जागतिक कोरोना केसच्या आकडेवारीचा यामध्ये अभ्यास करण्यात आलाय. लवकरच आपण कोरोनाविरुद्धची लढाई जिंकू आणि या युद्धाचा शेवट आता जवळ आलाय असं भाष्य या रिपोर्टमध्ये करण्यात आलंय. याचसोबत कोरोना रुग्णांचा अंदाज वर्तवण्यासाठी मुंबई युनीव्हर्सीटीने (mu.ac.in/covid19lab) ही नवीन साईट देखील लॉन्च केलीये. 

रिसर्चकर्ते हातेकर आणि बेल्हेकर यांच्या सांगण्यानुसार मुंबईतील काही वॉर्डमधील कोरोना रुग्णसंख्या दुप्पट होण्याचं प्रमाण १७ एप्रिल ते २७ एप्रिल या कालावधीदरम्यान जास्त होतं. मात्र बराचश्या भागांमध्ये रुग्ण दुप्पट होण्याचं प्रमाण कमी झालंय. त्यामुळे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुंबईतील कोरोना रुग्णांची आकडेवारी ४० हजारांपर्यंतदेखील जाणार नाही असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या वाढण्यास त्यापूर्वीच आळा बसेल आणि मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या ३५ हजारांवर स्थिर होऊ शकते असं देखील त्यांनी म्हटलंय. तर महाराष्ट्रातील रुग्णसंख्या ही साधारण ५० हजारांचा टप्पा २१ मे पर्यंत गाठू शकते असं देखील त्यांनी म्हटलंय.      

या रिसर्चमध्ये आणिखीन एक महत्त्वाची बाब नमूद करण्यात आली आहे. ज्यामध्ये भारतातील कोरोना रुग्ण हे प्रामुख्यमने राज्यांतील काही विशिष्ठ भागांमध्ये असल्याचं पाहल्याला मिळत असल्याचं म्हटलंय. उदाहरणार्थ महाराष्ट्रातील ५५ % कोरोना केसेस या मुंबई, ठाणे,  पुणे,  नाशिक नागपूर या शहरांमध्ये आहेत, मध्य प्रदेशातील ५६ टक्के कोरोना रुग्ण हे भोपाळ आणि इंदौर या दोन शहरात आहेत. राजस्थानातील ४१ % कोरोना कैसे या जयपूर जोधपूर आणि भागलपूर या भागातील आहेत. 

दरम्यान या रिपोर्टमध्ये एक खळबळजनक दावा देखील करण्यात आलाय. सध्या देशभरातील परप्रांतीय कामगार आपापल्या गावी जातायत. त्यामुळे कोरोना पुन्हा एकदा फैलावु शकतो असं देखील म्हटलंय. यामुळे कोरोना राज्यांमधील ग्रामीण भागात फोफावू शकतो, ज्यावर नियंत्रण मिळवणं कठीण होऊ शकतो असं हातेकर यांनी सांगितलंय.  

the end is near Covid19 Situation in Maharashtra is getting better says report

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com