esakal | गुड न्यूज! प्लाझ्मा थेरपीचा मार्ग मोकळा...नमुन्यांची तपासणी अँटीबॉडीजसाठी सकारात्मक
sakal

बोलून बातमी शोधा

गुड न्यूज! प्लाझ्मा थेरपीचा मार्ग मोकळा...नमुन्यांची तपासणी अँटीबॉडीजसाठी सकारात्मक

कोरोना आजारातून बरे झालेल्या चार जणांच्या रक्ताच्या नमुन्यांची तपासणी अँटीबॉडीजसाठी सकारात्मक झाली. त्यांचा प्लाझ्मा आता इतर रुग्णांच्या उपचारांसाठी वापरून त्यांच्यावर उपचार करण्यात येणार आहेत. त्यामुळे अधिकाधिक दात्यांनी पुढे येण्याचे आवाहन सरकार तसेच पालिका प्रशासनाने केले आहे.

गुड न्यूज! प्लाझ्मा थेरपीचा मार्ग मोकळा...नमुन्यांची तपासणी अँटीबॉडीजसाठी सकारात्मक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोना आजारातून बरे झालेल्या चार जणांच्या रक्ताच्या नमुन्यांची तपासणी अँटीबॉडीजसाठी सकारात्मक झाली. त्यांचा प्लाझ्मा आता इतर रुग्णांच्या उपचारांसाठी वापरून त्यांच्यावर उपचार करण्यात येणार आहेत. त्यामुळे अधिकाधिक दात्यांनी पुढे येण्याचे आवाहन सरकार तसेच पालिका प्रशासनाने केले आहे.

मुंबईतील महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

केंद्र सरकारने प्लाझ्मा थेरपीला परवानगी दिल्यानंतर कोरोना आजारातून बरे झालेल्यांंच्या रक्तातून प्लाझ्मा घेऊन अँटिबॉडीज तयार करण्याच्या थेरपीला सुरूवात झाली होती. पालिकेच्या नायर रुग्णालयात यासाठी विशेष 'लॅब'ची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच पुण्यातील ससून रुग्णालयात देखील प्लाझ्मा थेरपीची तयारी करण्यात आलाय आहे.

अधिक आणि सविस्तर बातम्या वाचण्यासाठी ईपेपर वाचा

झ्मा थेरपीसाठी लागणारी प्रक्रिया पूर्ण होऊन कोरोना आजारातून बरे झालेल्या चार रुग्णांकडून प्लाझ्माचे चार युनिट कोरोनाच्या उपचारासाठी मिळवण्यात आले होते. त्यातून अँटीबॉडीज तयार करून ते कोरोना बाधितांच्या उपचारासाठी परिणामकारक सिद्ध होतील का  याची तपासणी करण्यात येत होती. कोरोना आजारातून बरे झालेल्या चार जणांच्या रक्ताच्या नमुन्यांची तपासणी अँटीबॉडीजसाठी सकारात्मक झाली असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने ट्विट करून दिली आहे.

शिवाय  प्लाझ्मा थेरपी आता इतर रुग्णांच्या उपचारांसाठी वापरून त्यांच्यावर उपचार करण्यात येणार असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे. प्लाझ्मा थेरपीच्या माध्यातून गंभीर कोरोना बाधितांवर उपचार करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून कोरोना आजारातून बरे झालेल्या व्यक्तींनी पुढे येऊन आपले प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन ही सरकार आणि पालिकेकडून करण्यात आले आहे.

प्लाझ्मा थेरपी उपचार पात्र ठरलेल्या कोरोना रुग्णांना वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार देण्यात येणार आहे.यासाठी रुग्णांची रक्त गट तपासणी करणे आवश्यक असून त्यांचे प्लाझ्मा उपचार करण्यात येणाऱ्या रुग्णांशी जुळविण्यात येत आहेत. या प्रक्रियेसाठी लागणारा प्लाझ्मा फेरेसिस मशीन मुंबईतील नायर तसेच पुण्यातील ससून रूग्णालयात लावण्यात आले आहे. यामुळे कोरोना आजारापासून बरे झालेल्या रुग्णांना बोलावून प्लाझ्माचे विलगिकरण करण्याची प्रक्रिया जलद गतीने व प्रभावीपणे करणे शक्य होणार आहे . प्लाझ्मा थेरपीचा लाभ गंभीर प्रकारच्या रुग्णांना होणार असल्याचे सांगण्यात येते.

संकट आहे गंभीर, मात्र मुंबई महापालिका आहे खंबीर, पण संकट दहा पट वाढलं तर... ? याला कारण आहे 'हे'...
 

दिल्लीमध्ये प्लाजा थेरपीचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर राज्यात देखील प्लाझ्मा थेरपी वापरण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडे परवानगी मागण्यात आली होती. ही परवानगी मिळल्यानंतर या थेरपीला प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे. राज्यात 5 ते सह टक्के कोरोना बाधित गंभीर रुग्ण आहेत. त्यांतील काही रुग्णांवर प्रयोजिक तत्वावर प्लाझ्मा थेरपीने उपचार करण्यात येणार आहेत.

प्लाझ्मा थेरपीची निरीक्षणे अंतिम टप्प्यात आहेत. बरे झालेल्या रुग्णांकडून प्लाझ्मा घेण्याचे काम सुरू आहे. पुढील 2 ते 3 दिवसात प्रत्यक्ष प्लाझ्मा थेरपीला सुरुवात होईल.

डॉ. मोहीम जोशी , अधिष्ठाता , नायर रुग्णालय

loading image
go to top