संकट आहे गंभीर, मात्र मुंबई महापालिका आहे खंबीर, पण संकट दहा पट वाढलं तर... ? याला कारण आहे 'हे'...

सकाळ वृत्तसेवा
Monday, 27 April 2020

क्वारंटाईनमध्ये असलेल्या व्यक्तींना सांभाळण्यात महापालिकेची चांगलीच दमछाक होत आहे. त्यातच या पंधरावड्यात हा ताण किमान दहा पटीने वाढण्याची शक्यता.

मुंबई,ता.27: क्वारंटाईनमध्ये असलेल्या व्यक्तींना सांभाळण्यात महापालिकेची चांगलीच दमछाक होत आहे. त्यातच या पंधरावड्यात हा ताण किमान दहा पटीने वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईत सध्या 4 ते 5 हजार व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले आहे. खास करुन झोपडपट्ट्या आणि चाळींमधिल हायरिस्क व्यक्तींना क्वारंटाईन करण्यासाठी पालिकेने तयार केलेल्या केंद्रात ठेवण्यात येत आहे. यांना रोज दोन वेळचे जेवण आणि सकाळचा नाष्टा द्यावा लागतो.

सर्वात मोठा दावा; कोरोनावर होमियोपॅथीचे उपचार गुणकारी, गोळ्यांचं नाव आहे...

सुरवातीला अपुर्या सुविधांंमुळे नागरीकांमधून तिव्र प्रतिक्रीया उमटत होत्या. वरळी कोळीवाड्यातील 168 जणांना पोद्दार रुग्णालयात क्वारंटाईन केले होते.तेथील दुरावस्थेचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तत्काळ गैरसोय दुर करण्यात आली. त्यानंतर शहरातील प्रत्येक क्वारंटाईन केंद्रात बादली मग ब्रश अशा पासून प्राथमिक सुविधा पुरविण्यास सुरवात करण्यात आली.

सध्या क्वारंटाईन असलेल्या व्यक्तींची संख्या दहा पटीने वाढणार आहे.येत्या काही दिवसात 40 हजारच्या आसपास व्यक्तींना क्वारंटाईन करण्याची तयारी पालिका करत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात जेवणापासून सर्व सोय करताना पालिकेला चांगलाच घाम फुटणार आहे.

अत्यंत महत्त्वाचं :: सावधान ! 'ही' आहेत कोरोनाची नवी ६ लक्षणं... 

शाळांमध्ये जमिनीवर गाद्या 

महानगर पालिकेच्या शाळांमध्ये क्वारंटाईन केंद्र तयार करण्यात येत आहे. मात्र, या ठिकाणी वर्गामध्ये जमिनीवर गाद्या अंथरण्यात आल्या आहेत.तसेच काही शाळांमधिल स्वच्छते बाबतही नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

how mumbai municipal corporation will feed people in quarantine in patients increase by 10 times

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: how mumbai municipal corporation will feed people in quarantine in patients increase by 10 times