

Birth Certificate Scam
ESakal
मुंबई : मुंबईत महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांच्या संगनमताने बांगलादेशी, रोहिंगे यांना पैसे घेऊन जन्म प्रमाणपत्र देण्यात आल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी बोगस कागदपत्रांच्या आधारे हे प्रमाणपत्र दिल्याप्रकरणी दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे, तर आठ जणांविरोधात फौजदारी कारवाई करण्यात आली आहे, अशी धक्कादायक माहिती महापाैर रितू तावडे यांनी शुक्रवारी दिली. बांगलादेशींच्या घुसखाेरीत माेठा भ्रष्टाचार झाल्याचा आराेपही त्यांनी यावेळी केला.