
मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सलग तिसऱ्या वर्षी आय़ुक्तांनी सादर केला. मुंबई महापालिकेच्या इतिहासातला हा सर्वात मोठा अर्थसंकल्प ठरला. २०२५-२०२६ या आर्थिक वर्षासाठी ७४ हजार ४२७ कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. आयुक्त भूषण गगरानी यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी अर्थसंकल्पीय अंदाज १४.१९ टक्के इतका वाढलाय.