मुंबईकरांना लागले कोरोना लसीकरणाचे वेध, दिवसाला १२ हजार लसी देण्यास BMC ही सज्ज

मुंबईकरांना लागले कोरोना लसीकरणाचे वेध, दिवसाला १२ हजार लसी देण्यास BMC ही सज्ज

मुंबई : एकीकडे देशभरात कोरोना लसीकरणाची ड्रायरन  घेण्यात आली. तर आता मुंबईकरांना कोरोना लसीकरणाचे वेध लागलेत. आपल्याला लस कधी मिळणार याबाबत मुंबईकर आता आपापसात चर्चा करू लागलेत. दरम्यान, मुंबईत प्रत्यक्ष कोरोना लसीकरणाच्या सुरवातीलाही  वेग येत असल्याचं पाहायला मिळतंय. मुंबई महापालिकेने लसीकरणासाठी आपली पुर्वतयारी पूर्ण केलीये. पहिल्या टप्प्यात देण्यात येणाऱ्या लसीकरणामध्ये दिवसाला तब्बल १२ हजार नागरिकांना लस देण्याचं लक्ष्य मुंबई महापालिकेने डोळ्यासमोर ठेवलंय.

आठ लसीकरण केंद्रांच्या माध्यमातून हे लसीकरण होण्याची शक्यता आहे. तर पहिल्या टप्प्यातील लसीकरण हे १५ दिवसात पूर्ण केलं जाण्यावर देखील BMC चा भर असणार आहे. मुंबई महापालिकेकडून या केंद्रांसाठी पायाभूत सुविधा पुरवण्याची कामं सध्या सुरु असल्याचंही समजतंय. 

आठ केंद्रे कोणती ?

आठ केंद्रांच्या माध्यमातून मुंबईकरांना लस मिळणार आहे. यामध्ये केईएम रुग्णालय, नायर रुग्णालय, कूपर रुग्णालय, सायन रुग्णालय,  भाभा रुग्णालय, व्ही. एन. देसाई रुग्णालय, राजावाडी रुग्णालय, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय यांचा समावेश आहे. दरम्यान १२ वरून मुंबईतील लसीकरण केंद्रांची संख्या ५० वर नेण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे.

 लसीकरणाबाबतचे महत्त्वाचे मुद्दे :  

  • पहिल्या टप्प्यात आरोग्य क्षेत्रातील सुमारे सव्वालाख कर्मचाऱ्यांना ही लस दिली जाणार
  • करोनावरील लस पालिकेस उपलब्ध होताच त्यानंतरच्या २४ तासातच प्रत्यक्ष लसीकरण हाती घेतले जाणार
  • दुसऱ्या टप्प्यामध्ये पोलिस कर्मचाऱ्यांसह अत्यावश्यक सेवेमधील इतर घटकांतील कर्मचाऱ्यांच्या समावेश
  • दुसऱ्या टप्प्यात तब्बल पाच ते सहा लाख नागरिकांना लस दिली जाणार
  • तिसऱ्या टप्प्यामध्ये ५० लाख मुंबईकरांना लस दिली जाणार आहे. 
  • तिसऱ्या टप्प्यातही प्राधान्याने जेष्ठ नागरिक आणि लहानग्यांना कोरोनाची लस देण्यावर भर राहणार. ५० पैकी ३० लाख जेष्ठांना लस देण्यावर राहणार भर

BMC all set for giving vaccine to 12 thousand citizens through eight vaccination centers

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com