मुंबईत मास्क न घालणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यास सुरु, गोवंडीत गुन्हा दाखल

मुंबईत मास्क न घालणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यास सुरु, गोवंडीत गुन्हा दाखल

मुंबई: मुंबई महापालिका आणि पोलिस अधिकारी यांच्यात झालेल्या संयुक्त बैठकीनंतर मास्क न घालणा-यांविरोधात कठोर कारवाई करण्यात सुरूवात झाली आहे. या बैठकीच्या 24 तासांच्या आतच एका तरूणाविरोधात मास्क न वापरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पालिका कर्मचारी प्रथमेश जावध (29) यांच्या तक्रारीवरून 28 वर्षीय तरुणावर बुधवारी विना मास्क फिरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेंबूर सावली नाका परिसरात बुधवारी चार पालिका कर्मचारी तैनात असताना दुपारी दीडच्या सुमारास नीलम जंक्शन येथे एक तरुण पायी जात होता. त्यावेळी पोलिसांच्या पथकासह या तरूणाला विचारले असता त्याने समानधानकार उत्तर दिले नाही. तसेच पालिका कर्मचा-यांच्या हुज्जत घातल्यानंतर त्या तरूणाला पालिका कर्मचारी आणि पोलिस पथक पोलिस गोवंडी पोलिस ठाण्यात घेऊन आले. त्यावेळी त्याने त्याचे नाव राहुल वानखेडे असल्याचे सांगितले. अखेर पालिका कर्मचा-यांच्या तक्रारीनंतर मास्क न घातल्याप्रकरणी या तरूणावर भादंवि कलम 188 आणि 186 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पालिका आणि पोलिसांमध्ये झालेल्या संयुक्त बैठकीनंतर प्रथमच मास्क न वापरल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. मुंबई महापालिकेच्या पथकाने आता पोलिस आणि वाहतुक पोलिसांच्या मदतीने कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी याप्रकरणी तसे आदेश दिले होते. त्याच बरोबर नगरसेवकांचीही मदत घेण्याच्या सुचना आयुक्तांनी केल्या आहे. या कारवाईसाठी महापालिका आणि पोलिसांनी संयुक्त आराखडा तयार करावा असे आदेशही आयुक्तांनी दिलेत. दुकानदार, विक्रेते, दुकान-उपहारगृहे इत्यादी ठिकाणी काम करणारे विक्रेते आणि कर्मचारी, प्रभातफेरीला मास्क न वापरणाऱ्यावर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. 

आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्तांसह सहाय्यक अधिकारी आणि रुग्णांच्या अधिष्टात्यांसमवेत पोलिस प्रशानसा सोबत बैठक घेतली. या बैठकीला पोलिस उपायुक्त शहाजी उमप उपस्थित होते. सार्वजनिक परिसरांमध्‍ये ‘विना मास्क’ वावरणाऱ्या नागरिकांवर प्रत्‍येक वेळी, प्रत्‍येक ठिकाणी दंडात्‍मक कारवाई यापूर्वीच सुरु करण्यात आली आहे. यानुसार आजतागायत 40 हजार पेक्षा अधिक नागरिकांवर कारवाई करण्यात आली असून, यापोटी रुपये 1 कोटी 5 लाखांपेक्षा अधिक दंड वसूल करण्यात आला आहे.  दंडात्मक कारवाई ही आता अधिक कठोरपणे राबविण्याचे निर्देश बुधवारच्या बैठकी देण्यात आले. आयुक्तांनी यावेळी आवश्यक कलमानुसार कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.

सध्या बिना मास्क वावरणा-यांकडून 200 रुपयांचा दंड आकारला जातो. हा दंड 400 रुपयांपर्यंत वाढविण्याची शक्यता आहे. त्याच पालिका आणि पोलिस सबंधित व्यक्तीवर फौजदारी कारवाई करण्यास सुरूवात केली आहे.

---------------------------

(संपादनः पूजा विचारे)

BMC and Mumbai police meeting Not wear masks now offence directly

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com