

BMC
ESakal
मुंबई : महापालिका हद्दीतील जाहिरातींचे नियमन करण्याच्या अनुषंगाने महापालिकेकडून ‘जाहिरातीची मार्गदर्शक तत्त्वे-२०२५’ जाहीर करण्यात आली आहेत. आजपासून (ता. २७) ही मार्गदर्शक तत्त्वे महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहेत. जाहिरातदार, जाहिरात संस्था तसेच संबंधित सर्व घटकांनी या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.