

BMC Property Tax
ESakal
५०० चौरस फूट क्षेत्रफळाच्या घरांना मालमत्ता करातून सूट दिल्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) आता आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईतील ७०० चौरस फूट क्षेत्रफळाच्या घरांना आता मालमत्ता कर आकारला जाणार नाही. नवीन इमारतीतील ७०० चौरस फूट घरांना कर सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विरोधी पक्ष शिवसेना (यूबीटी) ने सादर केलेल्या या प्रस्तावाला महापौर रितू तावडे यांनी मान्यता दिली आहे. हा प्रस्ताव आता अंतिम मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवला जाईल.