

BMC
Esakal
मुंबई : कोणतीही कायदेशीर अधिसूचना किंवा अधिकृत आदेश जारी न करता मुंबई महापालिकेने जन्म-मृत्यू दाखल्यांमधील दुरुस्तीचे काम अनधिकृतपणे रोखून धरले आहे. प्रशासनाच्या या अघोषित बंदीमुळे मुंबईतील प्रभाग (वॉर्ड) स्तरावर सुमारे तीन हजारांहून अधिक अर्ज धूळ खात पडले आहेत. शाळा-कॉलेज प्रवेशासाठी धडपडणारे विद्यार्थी तसेच पासपोर्टसाठी अर्ज करणारे नागरिक प्रचंड संकटात सापडले आहेत.