महापालिकेकडून नालेसफाईला वेग

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 मे 2019

 ‘सकाळ’च्या प्रतिनिधींनी सलग दोन दिवस संपूर्ण मुंबईत फिरून नालेसफाईच्या कामाची ‘पोलखोल’ केली. त्यानंतर महापालिका प्रशासन जागे झाले. ‘सकाळ’मध्ये बुधवारी (ता. २९) प्रसिद्ध झालेल्या छायाचित्रांची दखल घेऊन संबंधित भागांत तातडीने नालेसफाई करण्यात आली.

मुंबई - ‘सकाळ’च्या प्रतिनिधींनी सलग दोन दिवस संपूर्ण मुंबईत फिरून नालेसफाईच्या कामाची ‘पोलखोल’ केली. त्यानंतर महापालिका प्रशासन जागे झाले. ‘सकाळ’मध्ये बुधवारी (ता. २९) प्रसिद्ध झालेल्या छायाचित्रांची दखल घेऊन संबंधित भागांत तातडीने नालेसफाई करण्यात आली.

मानखुर्दमधील चिता कॅम्पमधील नाल्याची सफाई सुरूच झाली नसल्याची बातमी ‘मुंबई टुडे’मध्ये बुधवारी छायाचित्रांसह प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर महापालिकेने तातडीने त्या नाल्याची सफाई सुरू केली. देवनारमधील  सुभाषनगर नालाही साफ करण्यात आला आहे. ‘टीम सकाळ’ने दोन दिवस मुंबईभर फिरून सफाई न झालेले नाले शोधून काढले. मिठी, दहिसर आणि पोयसर नद्यांच्या अनेक भागांची सफाई झाली नसल्याचेही आढळले. त्याबाबतची बातमी छायाचित्रांसह ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर महापालिका प्रशासन कामाला लागले. 

नालेसफाईचे काम ३१ मेपूर्वी पूर्ण होणे अपेक्षित असते. यंदा लोकसभा निवडणुकीचा फटका बसल्याने बऱ्याच ठिकाणी कामे अद्याप झालेली नाहीत. त्यामुळे नालेसफाई जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुरू राहण्याची शक्‍यता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BMC clean the drainage line