BMC आयुक्त इकबालसिंह चहल यांची देशातील सर्वात प्रभावशाली सनदी अधिकाऱ्यांमध्ये नोंद

समीर सुर्वे
Saturday, 17 October 2020

मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची देशातील 50 प्रभावशाली सनदी अधिकाऱ्यांमध्ये नोंद करण्यात आली आहे

मुंबई : मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची देशातील 50 प्रभावशाली सनदी अधिकाऱ्यांमध्ये नोंद करण्यात आली आहे.मुंबईतील कोविड नियंत्रणात आणण्याची जागतिक पातळीवर यापुर्वीच दखल घेण्यात आली असून काही दिवसांपुर्वीच त्यांना आय,सीसी कोव्हिड क्रुसेडर 2020 पुरस्कारने गौरविण्यात आले होते.

दसऱ्यापासून जिम, व्यायामशाळा सुरु करण्यास मान्यता - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

फेम इंडिया या मासिकाने कोव्हिड काळात प्रभावी काम करणाऱ्या देशभरातील 50 सनदी अधिकाऱ्यांची यादी जाहीर केली आहे.त्यात,मुंबई पालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्यासह वन विभागाचे अतिरीक्त मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांचाही या यादीत समावेश आहे. उत्कृष्ट प्रशासक,निर्णय क्षमता, व्यवहार कुशलता अशा सात विविध पातळ्यांचा अभ्यास करुन ही यादी तयार करण्यात आली आहे. देशातील 1984 ते 1995 या काळात आयएएस झालेल्या 200अधिकाऱ्यांमधून ही यादी तयार करण्यात आली आहे.

भारताची ऐश्‍वर्या श्रीधर "वाईल्ड लाईफ फोटोग्राफर ऑफ द ईयर' 

काही दिवसांपुर्वीच इंडो अमेरीका चेंबर ऑफ कॉमर्स तर्फे त्यांना आय, सीसी कोव्हिड क्रुसेडर 2020  पुरस्काराने गौरविण्यात आले होते. कोव्हिड काळात संसर्ग रोखण्यासाठी आणि मृत्यूदर कमी करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी मुंबई महानगर पालिकेचे जागतिक स्तरावर कौतुक झाले आहे.जागतिक आरोग्य संघटना,जागतिक बँकेने गौरव केला असून फिलीपाईन्सच्या वस्त्यांमध्येही धारावी पॅटर्न राबवला जात आहे

-------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BMC Commissioner Iqbal Singh Chahal among the most influential chartered officers in the country

टॉपिकस