ब्रेकिंग - मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांची तडकाफडकी बदली....

ब्रेकिंग - मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांची तडकाफडकी बदली....
Updated on

मुंबई : कोरोनाच्या संवेदनशील काळात मुंबईतून मोठी बातमी समोर येतेय. मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांची बदली करण्यात आली आहे. मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललीय. याच पार्श्वभूमीवर प्रवीण परदेशी यांची बदली केल्याची माहिती समोर येतेय.

प्रवीण परदेशी हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात. महाराष्ट्रातील सत्तापालटानंतर त्यांच्या बदलीच्या चर्चा सुरु होत्या. त्यानंतर मुंबईतील वाढत्या कोरोना रुग्णाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून प्रवीण परदेशी यांच्या बदलीची चर्चा पुन्हा एकदा समोर येत होती. 

अशात आता परदेशी यांची अखेर बदली करण्यात आली आहे. गेल्या वर्षी मे महिन्यातच प्रवीण परदेशी यांनी मुंबई महापालिकेचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला होता. अशात एका वर्षाच्या आत परदेशी यांची बदली करण्यात आली आहे.  

प्रवीण परदेशी यांची आता नगरविकास विभागात अतिरिक्त मुख्य सचिवपदी बदली करण्यात आलीये. प्रवीण परदेशी यांच्या जागी आता इक्बाल चहल हे देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून काम पाहणार आहेत. इक्बाल चहल हे सध्या नगरविकास तसेच जलसंपदा ही दोन मोठी खाती सचिव म्हणून सांभाळत होते. ते मुख्य सचिव अजय महेता यांच्या मर्जीतले अधिकारी मानले जातात.

दरम्यान संदीप जयस्वाल आणि अश्विनी भिडे हे मुंबई महानगरपालिकेचे ऍडिशनल कमिशनर असणार आहेत. याचसोबत मदत आणि पुनवर्सन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांची देखील बदली करण्यात आली आहे. 

BMC commissioner pravin pardeshi transferred Iqbal Chahal is new commissioner of BMC

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com