BMC निवडणूका महाविकासआघाडी एकत्र लढवणार? सुप्रिया सुळेंचे संकेत

BMC निवडणूका महाविकासआघाडी एकत्र लढवणार? सुप्रिया सुळेंचे संकेत

मुंबई - मुंबई महापालिकेची निवडणूक 2022 मध्ये होणार आहे. त्याकरीता शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीसह कॉंग्रेस आणि सपासारख्या पक्षांनी कंबर कसायला सुरूवात केली आहे. मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक एकत्रित लढवण्याचा निर्णय महाविकास आघाडीचे घटक पक्षांचे वरिष्ठ नेते घेतील असे सूचक विधान राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष  महापालिका निवडणूक एकत्र लढवणार असल्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी म्हटले होते. 

राज्यात सध्या महाविकास आघाडीची सत्ता असून, महाराष्ट्र विधान परिशदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीतही महाविकासआघाडीला चांगले यश मिळाले आहे. त्यामुळे आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणूका कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने सोबतच लढवाव्यात असे महाविकास आघाडीतील काही नेते बोलून दाखवत आहेत. परंतु खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे की,'महाविकास आघाडीने एकत्र महापालिका निवडणूक लढवावी याचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील'. त्यामुळे सध्या तरी, महाविकास आघाडीतील घटक पक्ष महापालिका निवडणूक एकत्र लढतील की नाही? यावर प्रश्नचिन्हच आहे.

'मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची पक्षसंघटना बांधणीच्या कामास गेल्या फेब्रुवारीपासून आम्ही सुरुवात केली होती. त्यासाठी सभा सुरू झाल्या होत्या, परंतु करोनामुळे ते काम थांबले. आता सभा, बैठका पुन्हा सुरू झाल्या आहेत. रविवारी नितीन देशमुख यांच्या कार्यालयाचे उद्घाटन झाले', असे मलिक म्हणाले होते. 

BMC to contest elections together? Hints of Supriya Sule

----------------------------------------------------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com