
मुंबई : मुंबई शहरासाठी महत्वाचा असलेल्या आणि पूर्व उपनगरांशी जोडणाऱ्या महत्त्वाच्या परळ टीटी उड्डाणपुलाच्या दुरुस्ती आणि बळकटीकरणासाठी महापालिकेने निर्णय घेतला आहे. पुलाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या या कामांसाठी अंदाजे १३ कोटी ८२ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून कंत्राटदाराची निवडही करण्यात आली आहे. ही दुरुस्ती पावसाळ्यानंतर टप्प्याटप्याने केली जाणार आहे. या कामामुळे वाहनांसाठी काहीसा अडथळा निर्माण होऊ शकतो.