esakal | 'ही' आहे कोरोनाबाधित मृतदेहांसाठीची नियमावली
sakal

बोलून बातमी शोधा

'ही' आहे कोरोनाबाधित मृतदेहांसाठीची नियमावली

अंत्यविधीसाठी पाचपेक्षा जास्त माणसांना उपस्थित राहता येणार नाही.

'ही' आहे कोरोनाबाधित मृतदेहांसाठीची नियमावली

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी कोरोनाबाधित मृतदेहाच्या अंत्यविधीसाठी नियमावली ठरवली आहे. शहरातील दफनभूमी या नागरी वस्तीत असल्याने अशा ठिकाणी मृतदेह दफन करता येणार नाही. मोठ्या दफनभूमीत मृतदेह दफन करावा लागणार आहे. त्यासाठी आवश्‍यक काळजी संबंधित कुटुंबाने घ्यावी. संपूर्ण जबाबदारी कुटुंबाची राहील, असे या आदेशात म्हटले आहे.

तसेच अंत्यविधीसाठी पाचपेक्षा जास्त माणसांना उपस्थित राहता येणार नाही. रुग्णालयाजवळील स्मशानभूमीतच त्यांचे अत्यसंस्कार करावयाचे आहेत. मृतदेह प्लास्टिकमध्ये गुंडाळून द्यावा, तसेच स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांनी हॅंडग्लोव्हज, मास्क तसेच इतर सुरक्षा साधने वापरावीत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या : 

काही तासांत आदेशात बदल 

आयुक्तांनी संध्याकाळी प्रसिद्ध केलेल्या आदेशात कोरोनाबाधित मृतदेह मुंबईत दफन करता येणार नाहीत असे म्हटले होते. यासाठी कुटुंबाला मृतदेह शहराबाहेर नेण्याची परवानगी देण्यात येईल असे नमूद केले होते.

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याबाबत पालिका आयुक्तांना पत्र लिहिले होते. त्यानंतर आयुक्तांनी नियमावली तयार केली; मात्र या नियमावलीवर मंत्री नवाब मलिक यांनी आक्षेप घेतल्यानंतर त्यात सुधारणा करण्यात आल्याचे समजते.  

BMC defines rules and regulations to destroy body of covid 19 patient


 

loading image