esakal | "भरपूर पाणी प्या आणि कोरोनाला पळवा" ; काय आहे व्हायरल सत्य/असत्य ?
sakal

बोलून बातमी शोधा

"भरपूर पाणी प्या आणि कोरोनाला पळवा" ; काय आहे व्हायरल सत्य/असत्य ?

व्हायरल मेसेज - "दिवसभरात भरपूर प्रमाणात पाणी प्या आणि कोरोनापासून बचाव करा" असा हा मेसेज आहे. दिवसभर काही वेळाच्या अंतरानं थोडं थोडं पाणी पित राहा यामुळे व्हायरस पोटात जातील आणि पोटातील ऍसिडमुळे त्यांचा नाश होईल."

"भरपूर पाणी प्या आणि कोरोनाला पळवा" ; काय आहे व्हायरल सत्य/असत्य ?

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई: कोरोनानं जगभरात थैमान घातलं आहे. आतापर्यंत कोरोनामुळे तब्बल ३३००० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतातही कोरोनाचे तब्बल ११०० च्या  वर रुग्ण आढळले आहेत. मात्र अशा परिस्थितीतही Whatsapp वर आणि सोशल मीडियावर या व्हायरसपासून बचाव करण्यासाठी काही घरघुती उपाय व्हायरल होत आहेत. यातलाच एक उपाय म्हणजे पाणी भरपूर प्या आणि कोरोनाला पळवा. मात्र आज आम्ही तुम्हाला या व्हायरल मेसेज मागचं सत्य सांगणार आहोत.

काय आहे हा मेसेज:

"दिवसभरात भरपूर प्रमाणात पाणी प्या आणि कोरोनापासून बचाव करा" असा हा मेसेज आहे. दिवसभर काही वेळाच्या अंतरानं थोडं थोडं पाणी पित राहा यामुळे व्हायरस पोटात जातील आणि पोटातील ऍसिडमुळे त्यांचा नाश होईल. तसाच आपला घसा आणि तोंड सतत ओलं ठेवा ज्यामुळे व्हायरस प्रवेश करू शकणार नाही यासाठी १५-१५ मिनिटांनी पाणी पित राहा. अशा प्रकारचे मेसेज सध्या सोशल मीडियावर फिरत आहेत.

हेही वाचा 'रामायण' मालिका  बनवली आणि एका रात्रीत झाले यशस्वी; रामायण मालिकेच्या मेकिंगची कहाणी

काय आहे या व्हायरल मेसेज मागचं सत्य:

"कोरोनाचा संसर्ग हा एका व्हायरल कणामुळे नाही तर हजारो किंवा लाखो पार्टिकल्सच्या संपर्कात आल्यानं होतो. त्यामुळे व्हायरसना नाहीसं करण्याचा फारसा परिणाम होणार नाही. मात्र असं करून तुम्ही सर्व व्हायरस पोटात नेऊन त्यांचा नाश केला असा तुम्ही समजत असेल. मात्र तोपर्यंत नाकामार्फत काही व्हायरस तुमच्या शरीरात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. जरी नाकामार्फत व्हायरस श्वासनलिकेत पोहोचले नाही तरीदेखील शरीराच्या इतर भागातून ते शरीरात जाऊ शकतात. डोळ्यांना, तोंडाला हात लावूनही व्हायरस तुमच्या शरीरात जाऊ शकतात. त्यामुळे फक्त भरपूर पाणी पिऊन कोरोना नाहीसा होतो हा दावा खोटा आहे", अशी माहिती लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसीनमध्ये एपिडेमोलॉजिस्ट असलेल्या 'कल्पना सबापैथी' यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलीये.

महत्त्वाची बातमी - मुंबईत रुग्ण आढळलेल्या भागाचं होणार GIS मॅपिंग; मुंबई पालिकेचा महत्त्वाचा निर्णय 

आपल्या शरीराराला पाण्याची गरज असते. अशात पाणी पिणं महत्त्वाचं आहे. मात्र फक्त पाणी पिऊन तुम्ही कोरोनापासून तुमचा बचाव करू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला स्वच्छ राहणं, हात पाय स्वच्छ धुणं आणि स्वतःची काळजी घेणं महत्वाचं आहे. त्याचबरोबर स्वतःला अलगीकरणात ठेवणं आणि लक्षणं आढळल्यास डॉक्टरांना त्वरित भेटणं गरजेचं आहे. 

drink lot of water and cure novel corona virus covid 19 fact check article

loading image
go to top