कोरोनामुळे आपल्या आसपास झालेत 'हे' चांगले बदल; बातमी वाचाल तर छान वाटेल... 

कोरोनामुळे आपल्या आसपास झालेत 'हे' चांगले बदल; बातमी वाचाल तर छान वाटेल... 

मुंबई : कोरोनामुळे संपूर्ण जगात दहशतीचं वातावरण पसरलं आहे. काही देशांमध्ये लॉकडाऊन असल्यामुळे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. भारतातही १५ एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. लोकांसाठी जणू काही जग थांबून गेलंय. मात्र या भयंकर महामारीतही काही गोष्टी अतिशय चांगल्या घडत आहेत.

प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आपण सर्वजण निसर्गात घडणाऱ्या चांगल्या गोष्टींसाठी जबाबदार आहोत. लॉकडाऊनमुळे देशात सर्वजण घरातच थांबले आहेत. त्यामुळे निसर्गात काही गोष्टी चांगल्या घडत आहेत त्या आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या चांगल्या गोष्टी घडण्यामध्ये तुमचाही सहभाग आहे त्यामळे तुम्हीही अभिनंदनाचे पात्र आहात.

  • लॉकडाऊनमुळे घरातच राहून तुम्ही लाखो लिटर पेट्रोल आणि डिझेल वाचवताय.  हेच पेट्रोल आणि डिझेल आपल्या पुढच्या पिढीला कामात येणार आहे.  
  • लॉकडाऊनमध्ये सर्व कारखाने आणि कंपन्या बंद असल्यामुळे प्रदूषणाचं प्रमाण कमी झालंय त्यामुळे आकाश निरभ्र दिसत आहे. प्रदूषणाचं प्रमाण कमी झाल्यामुळे तुमची प्रकृती चांगली राहण्यासाठी मदत होतेय. वातावरणातील ऑक्सिजन देखील वाढतोय.   
  • लॉकडाऊनच्या काळात तुम्ही सगळे घरीच असल्यामुळे तुम्ही निसर्गाला कुठल्याही प्रकारची हानी पोहोचवत नाहीये. त्यामुळे निसर्गाला मानवाच्या त्रासापासून कुठेतरी विश्रांती मिळतेय.
  • सगळ्यांना ऑफिसमधून सुट्टी असल्यामुळे आता तुम्हाला सकाळच्या अलार्मचा त्रास नाहीये. सकाळी उशिरापर्यंत झोपून आणि निवांत उठू शकताय. हे सुख काही वेगळंच आहे.
  • लॉकडाऊन असल्यामुळे तुम्ही आपल्या कुटुंबासोबत मोलाचे क्षण घालवू शकत आहात. तसंच आपल्या मित्रांशी चर्चा करता आहात किंवा गप्पा मारत आहात.
  • सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही कधी नव्हे ते संपूर्ण जगाच्या बातम्यांचा आढावा घेत आहात. त्यासोबतच देशात घडणाऱ्या घटनांवरही नजर ठेऊन आहात.
  • या काळात तुम्ही स्वतःच्या आरोग्याकडे आणि आहाराकडे विशेष लक्ष ठेवत आहात. तसंच तुमचे काही जुने छंद जोपासण्याची संधीही यामुळे तुम्हाला मिळत आहे.
  • कोरोनामुळे जग संकटात आहे त्यामुले चांगलं आरोग्य हीच खरी संपत्ती आहे हे तुम्हाला कळून चुकलंय. घरी थांबण्याचं महत्त्वही यामुळे आपल्याला कळलंय.
  • लॉकडाऊनमुळे गाड्यांच्या कर्कश आवाजाच्या ऐवजी तुम्ही चिमण्यांचा चिवचिवाट आणि झाडांच्या पानांचा आवाज ऐकू शकत आहात.
  • तुम्ही सर्व सामाजिक जबाबदारीचं भान ठेऊन एकमेकांना मदत करतायत. त्यामुळे सर्व जण जणू काही 'सुपर हिरो' झालो आहोत.

या सर्व गोष्टी केल्यामुळे तुम्ही अभिनंदनास पात्र आहात.

corona and lockdown has done these god things around us read full story

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com