BMC: 'खिचडी'च्या तव्यावर 'जर्मनी'ची फोडणी! महापौर-विरोधी पक्षनेत्यात वादाचा तडका

Mumbai Politics: मुंबई महापालिकेत राजकीय संघर्ष शिगेला पोहोचला आहे. महापौर रितू तावडे आणि विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू असल्यामुळे राजकारणात चर्चा रंगली आहे.
BMC Dispute Between ritu tawde and kishori pednekar

BMC Dispute Between ritu tawde and kishori pednekar

ESakal

Updated on

मुंबई : मुंबई महापालिकेत महापौर रितू तावडे आणि विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांच्यातील राजकीय संघर्ष शिगेला पोहोचला आहे. 'खिचडीखाऊ ताई' उल्लेखाने संतापलेल्या पेडणेकर यांनी 'जिम, जर्मनी ते परभणी'ने उत्तर देत तावडे यांच्यावर शरसंधान केले. 'दहा वर्षांत आपला पासपोर्टही बनलेला नाही' असे प्रत्युत्तर देत पेडणेकर यांनी केलेले आरोप त्यांनी फेटाळले. राजकीय वर्तुळात 'खिचडी'च्या तव्यावर 'जर्मनी'च्या या फोडणीची चांगलीच चर्चा रंगली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com